जाहिरात

Chhatrapati Sambhajinagar Crime News : संतापजनक! वाळू माफियांकडून महसूल पथकाला पेटवून देण्याचा प्रयत्न; थोडक्यात वाचला जीव

Sand smugglers attack on Tehsildar : सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी 4 वाळूतस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असून त्यापूर्वी वाळू माफियांचा गुंडगिरी पाहायला मिळत आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime News : संतापजनक! वाळू माफियांकडून महसूल पथकाला पेटवून देण्याचा प्रयत्न; थोडक्यात वाचला जीव

वाळू तस्करांनी तहसीलदारांवर जीवघेणा हल्ल्या केल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात ही घटना घडली आहे. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी 4 वाळूतस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडल्यानंतर महसूल विभागाच्या पथकावर वाळूतस्करांनी तुफान दगडफेक केली. एवढच नाही तर अधिकारी, कर्मचारी बसलेल्या शासकीय वाहन डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सुदैवाने चालकाने तात्काळ वाहन पळवल्याने त्यांचा जीव वाचला. घटनेचा माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी 4 वाळूतस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असून त्यापूर्वी वाळू माफियांचा गुंडगिरी पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस पाहायला मिळतो. पैठण, वैजापूर, सिल्लोड तालुक्यातील अनेक भागात तर बिनधास्तपणे वाळू उपसा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आता तर या वाळू माफियांची हिंमत एवढी वाढली आहे की, थेट महसूल विभागाच्या पथकावर डिझेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न झाला.हा सर्व धक्कादायक प्रकार सिल्लोड तालुक्यातील दीडगाव ते उपळी रस्त्यावर बुधवारी  रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी हल्ला करणाऱ्या वाळूतस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(नक्की वाचा-  Crime news: 'सॉरी मम्मी,पापा, मी तुमचं स्वप्न...' भावनिक पत्र लिहीत 18 वर्षाच्या मुलीचे टोकाचे पाऊल, 'ती'ने असं का केलं?)

काय आहे प्रकरण?

सिल्लोड तालुक्यातील भराडीचे मंडळ अधिकारी शंकर जैस्वाल हे कोटनांद्रा, धानोरा, लोणवाडी, भराडी, पळशी, मोढा खुर्द येथील तलाठी पोपट तायडे, संतोष इंगळे, अशोक निकाळे, सुमित बमनावत, दीपक जगताप, सूरज लांडकर, सुरक्षा रक्षक पी. के. मोरे, वाहन चालक बालाजी गायकवाड यांच्यासह वाळू तस्करी विरोधात कारवाईसाठी गस्तीवर निघाले होते. दरम्यान दीडगाव व उपळी रस्त्यावर अवैद्य वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर त्यांना आढळून आले. त्यामुळे या पथकाने दोन्ही ट्रॅक्टर थांबवून चौकशी करत कारवाई करण्यास सुरुवात केली. पण यावेळी वाळू माफियांनी महसूल पथकाशीच वाद घालायला सुरुवात केली. धक्कादायक म्हणजे महसूल पथकाच्या ताब्यातुन दोन्ही ट्रॅक्टर पळून नेले.

(नक्की वाचा- Rinku Rajguru: रिंकू होणार कोल्हापूरची सून? भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलासोबतच्या Photo ने चर्चा)

तुफान दगडफेक अन् पेटवून देण्याचा प्रयत्न

विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर महसूल पथकाने कारवाई केली. यावेळी वाळूतस्कर दादाराव दुधे नावाचा व्यक्ती काही लोकांना घेऊन तेथे आला. ट्रॅक्टर कसा पकडला असं म्हणत त्याने महसूल विभागाच्या पथकाशी वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर पथकावर दगडफेक देखील केली. यात महसूल विभागाच्या गाडीची काच देखील फुटली. काही वेळात तिथे आणखी वीस ते पंचवीस जण आले आणि त्यांनी तुफान दगडफेक सुरू केली. यातील एकाने पथकाच्या गाडीवर डिझेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. गाडीला आग लावणार तेवढ्यात सुरक्षा रक्षकाने त्यांना चेतावणी देत थांबवलं आणि कसं बस तिथून गाडी काढत आपला जीव वाचवला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
छत्रपती संभाजीनगर, तहसीलदार, Crime News