Mumbai News: मुंबईकरांना दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील महत्त्वाचा टप्पा असलेल्या वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाच्या कामाला आता गती मिळाली आहे. सध्या हे बांधकाम तब्बल 80 टक्के पूर्ण झाले असून पश्चिम द्रुतगती महामार्गाशी जोडणारे गर्डर उभारण्यात आले आहेत. यामुळे उर्वरित कामाला वेग आला आहे.
पूर्वी केबल-स्टेड पुलाच्या बांधकामामुळे काही भागांवर काम मंदावले होते. मात्र आता प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचल्याने मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. या मार्गामुळे सांताक्रुझ ते बीकेसीचे अंतर फक्त 5 मिनिटांत पार करता येणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- अंदाजित खर्च: ₹645 कोटी
- एकूण लांबी: 1.2 किमी
- लेन व्यवस्था: दोन्ही दिशांना दोन लेन
- थेट संपर्क: वाकोला जंक्शन, आंबेडकर चौक, युनिव्हर्सिटी जंक्शन, बीकेसी जंक्शन
(नक्की वाचा- Solapur-Akkalkot Highway: सोलापूर-अक्कलकोट मार्गावर कशी होतेय फसवणूक? हा Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा)
कुर्ला-घाटकोपर दरम्यान नवा फ्लायओव्हर
पूर्व उपनगरातली भीषण वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आता मुंबईत नवा फ्लायओव्हर बनवण्यात येणार आहे. कुर्ला ते घाटकोपरदरम्यान हा 4 किलोमीटरपेक्षा लांबीचा नवा उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे. कुर्ला-घाटकोपर नवा फ्लायओव्हर बनण्यात येणार असून यामुळे पूर्व उपनगरातील वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होईल असा अंदाज आहे. कुर्लाच्या कल्पना टॉकीजपासून पुलाची सुरुवात करण्यात येणार आहे.
कसा असेल कुर्ला-घाटकोपर नवा फ्लायओव्हर?
- 4 लेनची सुविधा
- 3.92 किमी - मुख्य रस्त्याची लांबी
- 4 वर्ष - कामकाजाची मुदत
- खर्च - 1,635 कोटी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world