
सूरज कसबे, प्रतिनिधी
देवाच्या आळंदीत आज पहाटे 5.30 वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 वे जन्म वर्ष आणि संत तुकाराम महाराजांच्या 375 व्या वैकुंठ गमन वर्षाचे औचित्य साधून संत तुकाराम महाराजांची आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची संतभेट सोहळा पार पडला. तब्बल 17 वर्षांनी हा संत भेटीचा योग जुळून आला आहे.
सन 1685 साली संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांनी पालखी सोहळा पंढरपूरहून येताना परतीचा प्रवास हा आळंदी मार्गे होता. त्या आठवणींना या सोहळ्याच्या निमित्ताने उजाळा मिळाला आहे. या संत भेट सोहळा याची देह याची डोळा पाहण्यासाठी आळंदीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं दृश्य अलंकापुरीत पाहायला मिळाले आहे.
नक्की वाचा - Pune News : स्वारगेट आगारातर्फे 'ज्योतिर्लिंग दर्शन सहली'चं आयोजन, कधीपासून होणार सुरुवात?
दरम्यान आज पहाटे 5.30 वाजता संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची भेट संजीवन समाधी मंदिरात पार पडलीय. यावेळी दोन्ही देवस्थानाचे विश्वस्त मंडळी उपस्थित होते. संत तुकाराम महाराजांची पालखी मंदिरातील कारंजा मंडपात मुक्काम केल्यानंतर सकाळी संत तुकाराम महाराजांची पालखी देहूकडे मार्गस्थ झाली आहे.

दुपारी संत तुकाराम महाराजांची पालखी चिखली येथील टाळ मंदिरात विसावा घेणार आहे. चिखली येथील प्रसिद्ध टाळ मंदिरात संत मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीमध्ये दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. या मंदिरात संत तुकाराम महाराजांचे दगडाचे टाळ असून या संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले असता तर दे या चिखली गावात टाळ ठेवले होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. आज त्याच मंदिरात संत तुकाराम महाराजांची पालखी दुपारी विसावा घेणार आहे. त्यानंतर सायंकाळी पालखी देहुनगरी दाखल होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world