Navi Mumbai Building Slab Collapsed: नवी मुंबई येथील कामोठे सेक्टर 10 मधील साई सिद्धी सोसायटीत बुधवारी पहाटे एक दुर्देवी घटना घडली. सहा मजली इमारतीत असलेल्या एका बेडरूमचा स्लॅब कोसळून सुरेश लोखंडे (39) यांचा मृत्यू झाला.तर त्यांची 12 वर्षीय मुलगी वेदिका लोखंडे या दुर्घटनेमुळं जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून इमारतीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
कामोठे सेक्टर 10,प्लॉट क्रमांक 61 येथील सहा मजली साई सिद्धी सोसायटीमधील फ्लॅट क्रमांक 101 मध्ये सुरेश लोखंडे त्यांच्या कुटुंबासह राहत होते. बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुरेश लोखंडे आणि त्यांची मुलगी वेदिका बेडरूममध्ये झोपलेले असताना अचानक बेडरूममधील स्लॅबचा काही भाग कोसळला.
नक्की वाचा >> Mumbai Rain Video: कल्याण डोंबिवलीसह हा परिसर जलमय, शिळफाटा-मुंब्रा रोड पाण्याखाली, घरांमध्येही शिरलं पाणी
लोखंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
या दुर्घटनेत स्लॅबचा मोठा भाग सुरेश लोखंडे यांच्या छातीवर व शरीरावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर काही भाग मुलगी वेदिकाच्या अंगावर पडल्याने ती जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच सोसायटीतील रहिवाशांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी सुरेश लोखंडे यांना मृत घोषित केले. जखमी वेदिका लोखंडे हिच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नक्की वाचा >> Pune News: 'बस आज की रात है जिंदगी..', केतनसह सियाच्या कुटुंबीयांचा 'तो' व्हिडीओ समोर, 7 मे रोजी काय घडलं?
या दुर्दैवी घटनेमुळे लोखंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान,इमारतीच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षिततेबाबत रहिवाशांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.संबंधित यंत्रणांकडून दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world