नवीन शैक्षणिक वर्षापासून नर्सरी ते पाचवी पर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर सुरू कराव्यात अशी सुचना राज्य सरकारने केली होती. तसे परिपत्रकही काढण्यात आले होते. आज सगळीकडे शाळा सुरू झाल्या. त्यामुळे नर्सरी ते पाचवीचे वर्ग नऊ नंतर सुरू होतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे होताना दिसले नाही. अनेक शाळा या सकाळी सात वाजताच सुरू केल्या गेल्या. त्यामुळे राज्यपाल रमेश बैस यांनी केलेल्या सुचना आणि शालेय शिक्षण विभागाने त्यानंतर काढलेले परिपत्रक याला शाळांनी केराची टोपलीच दाखवल्याचे चित्र त्यामुळे पाहायला मिळाले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सकाळी सात वाजता शाळा सुरू केल्याने लहान मुलांच्या झोपेवर परिणाम होतो. त्यांच्या मनासिकतेवरही त्याचा ताण पडतो. सध्या सर्वांचीच जीवन शैलीबदलत आहे. अशा वेळी सकाळी लवकर शाळा असेल तर लहान मुलांच्या झोपेवर त्याचा थेट परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सकाळी सात ऐवजी नऊनंतर शाळा सुरू कराव्यात अशा सुचना राज्यपालांनी केल्या होत्या. त्यानुसार सरकारनेही सरकारीसह खाजगी शाळांनाही याबाबत सुचना केल्या. शिवाय एक परिपत्रकही काढले गेले. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. नेहमी प्रमाणे आज शाळेचा पहिला दिवसही सकाळी सात वाजताच सुरू झाला आहे. त्यामुळे सरकारने काढलेल्या परिपत्रकाला काही अर्थ आहे की नाही याची चर्चा सुरू झाली आहे.
ट्रेंडिंग बातमी - मोठा गौप्यस्फोट! 100 कोटींचा आकडा, जरांगेंच्या नावाने काय काय झालं?
या सर्व गोंधळामुळे पालकांचाही गोंधळ उडाला आहे. सकाळी सात की नऊ याबाबत अजूनही स्पष्टता आली नाही. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा नऊ ऐवजी सात वाजताच उघडल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही लवकर उठाले लागले. त्यामुळे या पुढच्या काळातही सकाळी सात वाजताच आपल्या पाल्याला शाळेत सोडावे लागणार की पुन्हा एकदा शाळेच्या वेळात बदल होणार या बाबत संभ्रम होणार आहे. दरम्यान या आधीच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नर्सरी ते पाचवी पर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर सुरू होतील अशी घोषणा केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world