सूरज कसबे, पिंपरी-चिंचवड
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिककडून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर सायमन ग्रँट यांनी पवारांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती दिली असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले आहे.
मेडिकल बुलेटिनमध्ये काय?
शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं डॉ. सायमन ग्रँट यांनी सांगितलं आहे. शरद पवारांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत आहे. काल त्यांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यांना होत असलेला त्रास काही प्रमाणात कमी झाल्याचही डॉक्टरांचे म्हणणं आहे.
(नक्की वाचा- Big News: CM फडणवीस तातडीने दिल्ली दौऱ्यावर; NCP च्या विलिनीकरणावर मोठा निर्णय होणार?)
कार्यकर्त्यांना विशेष आवाहन
खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवारांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. हॉस्पिटलच्या प्रोटोकॉलनुसार शरद पवारांवर उपचार सुरू आहे आणि बारकाईने लक्षात ठेवण्यात येत आहे. कोणत्याही कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी हॉस्पिटलच्या आवारात गर्दी करू नये असं आवाहन रुग्णालयाकडून करण्यात आले.
(नक्की वाचा- Mumbai News: मुंबईत गाडी चालवण्यासाठी भरावा लागणार 'कंजेश्चन टॅक्स'? भाजप नेत्याचा BMC ला प्रस्ताव)
शरद पवारांना छातीत संसर्ग झाला असून 5 दिवसांचा अँटीबायोटिक्सचा कोर्स सुरू आहे. डॉक्टरांच्या या ताज्या अपडेटमुळे आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील चिंतेचे वातावरण कमी झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world