Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यानं त्यांना सोमवारी (9 फेब्रुवारी) पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना श्वास घेण्यात त्रास होत होता, यामुळे त्यांना उपचारांसाठी तातडीने बारामतीतून पुण्यात हलवण्यात आले. रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोगतज्ज्ञ आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट यांनी सांगितले की, शरद पवार यांचे सीटी स्कॅन करण्यात आले, या रिपोर्टमध्ये त्यांच्या छातीमध्ये संसर्ग झाल्याचे दिसून आले. शरद पवार यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले त्यावेळेस त्यांच्यासोबत मुलगी सुप्रिया सुळे, जावई सदानंद सुळे उपस्थित होते. थोड्या वेळाने नातू रोहित पवार देखील हॉस्पिटलमध्ये पोहोचले. दरम्यान रात्री उशीरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांनीही हॉस्पिटलमध्ये जाऊन पवार यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
शरद पवार यांची प्रकृती स्थिर | Sharad Pawar News | Sharad Pawar Health
प्राथमिक तपासणी करण्यात आल्यानंतर शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आलीय. तपासणीनंतर शरद पवार यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
VIDEO | Pune: Maharashtra Deputy CM Sunetra Pawar leaves Ruby Hall Clinic after meeting NCP (SP) chief Sharad Pawar.
— Press Trust of India (@PTI_News) February 9, 2026
Sharad Pawar was admitted to a private hospital earlier today after being diagnosed with a chest infection; his condition is stated to be stable.
(Full video… pic.twitter.com/wLKPNu6lEl
शरद पवार यांना नेमकं काय झालंय?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तोंडाच्या कर्करोगातून बरे झालेले पवार यांना घशाचा संसर्ग, सतत खोकला आणि छातीत जळजळ होत आहे.
(नक्की वाचा: Sharad Pawar Health Update: राशप अध्यक्ष शरद पवारांच्या प्रकृतीत बिघाड)
सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहितीखासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी यांनी सांगितले की, "बाबांना छातीत कफ झाला आहे. डॉक्टरांनी पाच दिवसांचा अँटिबायोटिक्सचा उपचार सुचवला आहे. सुदैवाने इतर सर्व महत्त्वाचे पॅरामीटर्स सामान्य असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. योग्य उपचार सुरू असल्याने काळजीचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तुमच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबाबत सर्वांचे आभार. सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार".
रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांनी काय सांगितलं?Baba has developed chest congestion and will need a 5-day course of antibiotics. Fortunately, all other vital parameters are normal. Thank you all for your good wishes and constant support. A heartfelt thank you to all the doctors from the bottom of my heart. 🙏
— Supriya Sule (@supriya_sule) February 9, 2026
रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. अभिजित लोढा यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, "शरद पवार (Sharad Pawar Health) यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. गेल्या काही दिवसांतील धावपळीमुळे त्यांना थकवा जाणवत होता. छातीमध्ये थोडा कफ असल्याने श्वसनाशी संबंधित तपासणीही करण्यात आलीय. सध्या त्यांना खासगी कक्षात ठेवण्यात आले आहे आणि ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची आवश्यकता नाही".
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world