देवा राखुंडे, बारामती
बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा आज सुरुवात झाले आहे. पवार कुटुंबियांना परंपरेप्रमाणे निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात कन्हेरीत मारुतीरायाचं दर्शन घेऊन केली आहे. यावेळी भाषण करताना शरद पवारांना अजित पवारांवर नाव न घेता निशाणा साधला. मी कुणाचंही घर फोडलं नाही. लोकसभा निवडणुकीतील अजित पवारांच्या भाषणाची आठवण देखील शरद पवारांनी करुन दिली. यावेळी शरद पवारांना अजित पवारांची नक्कर करत, त्यांच्या लोकसभेतील भाषणाला आता उत्तर दिलं आहे.
अजित पवारांना सोमवारी केलेल्या भाषणात शरद पवारांना निशाणा साधला होता. यावेळी घर फोडल्याचं वक्तव्य आपल्या भाषणात त्यांनी केलं होतं. शरद पवार यांनी म्हटलं की, घर मी फोडलं असं सांगण्यात आलं. घर फोडण्याचं काही कारण नाही. कुटुंब कसं एक राहिलं हे मी करणार आहे. अनेकांना मी पदं दिलं. एक पद मी सुप्रियाला दिले. दुध संघ, इतर संस्थांचे अधिकार तुम्हाला दिले. एक माणूस तरी मी निवडला का? सर्व अधिकार तुम्हाला दिले. घर फोडण्याचं पाप माझ्या भावाने मला शिकवलं नाही. त्यांना माझ्याकडून अंतर होणार नाही, असंही अजित पवार यांनी म्हटलं.
सहा महिन्यापूर्वी सुप्रियाची निवडूक होती, सुनेत्रा उभी होती. पण भाषणं काय होती. भावनिक होऊ नका. चांगलं आहे, मग कालच्या सभेत डोळे पुसण्याची गरज काय होती, असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांची खिल्ली उडवली.
आयुष्यात मी कोर्टात उभा राहिलो नव्हतो
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवरही शरद पवारांनी पहिल्यांदाच उघड भाष्य केलं. आम्ही लोकांनी पक्ष काढला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अनेक लोक निवडून आले.राज्य आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी काढला. माझ्या आयुष्यात मी कोर्टात उभा राहिलो नव्हतो. काही लोकांनी आमच्यावर खटला केला. हा पक्ष ही खुण त्यांची नाही, आमची आहे. कोर्टाने मला एक समन्स काढलं. मी कोर्टात गेलो उभा राहिलो. तक्रार माझ्याविरोधात होती, माझ्या आयुष्यात कधी असं घडलं नव्हतं, असं म्हणत शरद पवारांना नाराजी व्यक्त केली.