प्रांजल कुलकर्णी, नाशिक
नाशिकच्या देवळाली मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. देवळालीच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरोज आहिरे याच आहेत, असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. महायुतीच्या नेत्यांसोबत वरिष्ठ पातळीवर चर्चा केली जाईल आणि यावर तोडगा काढला जाईल, असं छगन भुजबळांनी म्हटलं. आता शिवसेना शिंदे गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नाशिकचा देवळाली मतदारसंघ सध्या राज्यभर चर्चेत आहे. महायुतीकडून अजित पवार गटाच्या सरोज आहिरे आणि शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव आमने-सामने आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजश्री अहिरराव अचानक नॉट रिचेबल झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.
(नक्की वाचा- "प्रवक्ते पद गेलं तरी चालेल...", कराळे मास्तरांनी घेतली आपल्याच पक्षाची 'शाळा')
शिवसेना शिंदे गटाची अजित पवार गटाविरोधाची ही खेळी आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान राजश्री अहिरावांना एनडीटीव्ही मराठीशी बोलताना म्हटलं की, नाशिकमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काय झाले याची मला कुठलीही कल्पना नाही. माघारी बाबत माहिती नाही. मी देवदर्शन करत होते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. माझ्यासमोर कोणाचेही आव्हान नसून माझा विजय निश्चित असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
(नक्की वाचा- "...तर महाराष्ट्राला कुणीही वाचवू शकणार नाही", फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरे काय म्हणाले?)
देवळाली मतदारसंघाबाबत आज बैठक
देवळाली मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत शिवसेना शिंदे गटाची आज महत्त्वपूर्ण बैठक आहे. बैठकीत पक्षाकडून शिवसेनेच्याच उमेदवाराला पाठिंबा देण्यात येणार की नाही? हे स्पष्ट होईल. संपर्क प्रमुख जयंत साठे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राजश्री आहिरराव यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी या मागणीचे पत्र पक्षाकडून निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये काल देण्यात आले होते. मात्र नियमानूसार हे पत्र ग्राह्य धरण्यात आले नाही. देवळालीमध्ये आता महायुतीकडून शिवसेनेच्या राजश्री अहिरराव आणि अजित पवार गटाच्या सरोज अहिरे या दोन उमेदवार रिंगणात आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world