जाहिरात

पुतळा बसवण्याची कायदेशीर प्रक्रिया काय? किती घ्याव्या लागतात परवानग्या ?

एखादा पुतळा बसवतानाची कायदेशीर प्रक्रिया काय असते? त्यासाठी किती कालावधी जातो? किती परवानग्या घ्याव्या लागतात याचा आढावा आपण घेणार आहोत.

पुतळा बसवण्याची कायदेशीर प्रक्रिया काय? किती घ्याव्या लागतात परवानग्या ?
पुणे:

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्गात कोसळला. त्यानंतर राज्यात संतापाची लाट उफाळून आली आहे. आठ महिन्या पूर्वी उभा केलेला पुतळा कसा काय कोसळला? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याची चौकशी होईल. अहवाल येतील. कारवाया होतील. पण एखादा पुतळा बसवतानाची कायदेशीर प्रक्रिया काय असते? त्यासाठी किती कालावधी जातो? किती परवानग्या घ्याव्या लागतात याचा आढावा आपण घेणार आहोत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पुतळा बसवताना किती परवानग्या घ्याव्या लागतात? त्याची कायदेशी प्रक्रिया काय असते असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. आपण तेच या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण पुरंदरच्या पायथ्याशी उभारला जाणाऱ्या छत्रपती संभाजी राजेंच्या पुतळ्याचे उदाहरण घेणार आहोत. हा पुतळा शिवराय सोशल फाऊंडेशनवतीने उभारला जात आहे. यासाठी सारिका जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. छत्रपती संभाजीराजेंचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र नारायणपूर येथे हा पुतळा उभारला जाईल. त्यासाठी सारिका जगताप यांना किती परवानग्या घ्याव्या लागल्या? किती वेळा त्यांनी सरकारी उंबरठे झिझवले? किती वर्षात त्यांना किती परवानग्या मिळाल्या हे त्यांनी सविस्तर पणे सांगितले आहे. त्यावरून एक पुतळा उभा करण्या मागे किती मोठी यंत्रणा असते हे आपल्या लक्षात येईल. 

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री म्हणाले, पुतळा कोसळण्यासाठी वारा दोषी; पण काय आहे परिस्थिती? स्थानिकांचा खुलासा

पुतळा उभा करण्यासाठी सर्वात आधी परवानगी लागते ती कला संचालनालयाची. या संचालनालयाकडे पहीले निवेदन द्यावे लागते. त्यानंतर कला संचलनालयातील तज्ज्ञ पुतळ्याची पाहाणी करतात.पुतळ्याचा आकारापासून ते आखीव -रेखीव गोष्टींकडे काळजीपूर्वक पाहीले जाते. सारीका जगताप यांनी कला संचलनालयाकडे परवानगी मागितल्यानंतर तीन तज्ज्ञ त्यांच्याकडे आले होते. त्यांनी जवळपास चार वेळा पुतळ्यामध्ये दुरूस्ती सुचवली होती. त्यात डोळे, हात तलवार, यामध्ये सुधारणा सुचवल्या गेल्या होत्या. 

ट्रेंडिंग बातमी - शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार आपटेंनी तेव्हाच व्यक्त केली होती भीती, पण तरीही दुर्लक्ष?

त्यानंतर इतिहास अभ्यासक या पुतळ्याची तपासणी करतात. त्यात सिंहासन कसे आहे, त्यावर कोरलेली नक्षी असेल किंवा पशू पक्षी असतील त्याचे बारीक निरिक्षण केले जाते असे जगताप यांनी सांगितले. जो पर्यंत नियमात सर्व काही बसत नाही, तो पर्यंत बदल करायला सांगितले जातात. ते बदल जगताप यांनीही पुतळ्यात केले. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी त्यांना कला संचालनालयाची परवानगी मिळाल्याचं त्या सांगतात. 

ट्रेंडिंग बातमी - मोहन भागवतांना आता पंतप्रधान मोदींच्या दर्जाची सुरक्षा, अचानक का केले बदल?

यानंतर परवानगी लागते ते सार्वजनिक बांधकाम विभागाची. त्यांच्याकडे प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करावा लागतो. त्यात पुतळ्याच्या चारही बाजूंना काय आहे याची माहिती द्यावी लागते. जेणे करून भविष्यात पुतळ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये हे त्यामागचे कारण आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगी शिवाय, पोलीसांची परवानगी, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. या सर्व परवानग्या देताना सर्व गोष्टी तपासून घेतल्या जातात. त्यात काही अडचणी जाणवल्या तर त्यात पुन्हा सुधारणा करण्यास सांगितल्या जातात. जगताप गेल्या दोन वर्षां पासून या परवानग्यामध्ये अडकल्या आहेत. संपूर्ण परवानग्या मिळवण्यासाठी आणखी एक वर्ष जाईल असं त्या सांगत आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - सिडकोची लॉटरी, स्वप्नातल्या घराच्या किंमती कितीने वाढल्या?

सारीका जगताप यांच्या उदाहरणावरून एक अंदाज येते की एखादा पुतळा बसवण्यासाठी किती परवानग्या घ्याव्या लागतात. त्यासाठी काय काय करावे लागते. त्याला किती कालावधी लागतो. पण सिंधुदुर्गात बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठीची प्रक्रिया केवळ आठ महिन्यात पूर्ण करण्यात आली. ऐवढ्या मोठ्या पुतळ्यासाठी सरकारी यंत्रणेचा कसा वापर झाला असेल याचा अंदाज जगताप यांच्या उदाहरणावरून आपल्याला लावता येईल. ऐवढ्या कमी कालावधीत ऐवढ्या सर्व परवानग्या कशा मिळाळ्या असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे.  

Switch To Dark/Light Mode
Previous Article
पुतळा वाऱ्यामुळे कोसळला? काय आहे खरी परिस्थिती? NDTV चा ग्राऊंड रिपोर्ट
पुतळा बसवण्याची कायदेशीर प्रक्रिया काय? किती घ्याव्या लागतात परवानग्या ?
Badlapur crime 52-year-old father sexually abused his 15-year-old daughter
Next Article
बदलापूर पुन्हा हादरलं! चिमुरडी पुन्हा एकदा ठरली बळी, सख्ख्या नात्याने गाठली क्रौर्याची परिसीमा!