शिवसेना शिंदे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिला यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण 45 उमेदवारांचा समावेश आहे. जवळपास सर्वच विद्यमान आमदारांवर पक्षाने तिकीट देत पुन्हा संधी दिली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पहिल्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट, प्रकाश सुर्वे, प्रताप सरनाईक, अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, उदय सामंत, दिपक केसरकर, तानाजी सावंत, भरत गोगावले अशी शिवसेनेच्या बड्या नेत्यांची नावे आहेत.
शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या यादीत तीन महिला उमेदवांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये यामिनी जाधव, मनिषा वायकर, मंजुळाताई गावित यांचा समावेश आहे.
(नक्की वाचा - MNS List : विधानसभा निवडणुकीत आणखी एक ठाकरे! अमित ठाकरे 'या' मतदारसंघातून मैदानात)
रत्नागिरी जिल्ह्यात सामंत बंधूंची नावे पहिल्याच यादीत जाहीर झाली आहेत. रत्नागिरीमधून उदय सामंत तर राजापूरमधून किरण सामंत हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. तर शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांना देखील उमेदवारी जाहीर झाली आहे.
अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघातून माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अभिजीत अडसूळ यांच्या उमेदवारीला भाजप नेत्या नवनीत राणा यांचा विरोध होता. मात्र नवनीत राणा यांचा विरोध डावलून पक्षाने अभिजीत अडसूळ यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
नाशिकच्या नांदगाव मतदारसंघातून समीर भुजबळ यांनी महायुतीचे तिकीट मिळावे अशी मागणी केली होती. मात्र शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे समीर भुजबळांच्या पुढील भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले लागले आहे.
( नक्की वाचा : जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेसने का बदलला चेहरा? थोरातांना दिलेल्या जबाबदारीचा अर्थ काय? )
जय महाराष्ट्र
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 22, 2024
हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे.
सर्व उमेदवारांना विजयी शुभेच्छा.@Shivsenaofc… pic.twitter.com/0rBkOkMTMU
शिवसेना उमेदवारांची नावे
- कोपरी पाचपाखाडी - एकनाथ संभाजी शिंदे
- साक्री - मंजूळाताई तुळशीराम गावित
- चोपडा- चंद्रकांत बळवंत सोनावणे
- जळगाव ग्रामीण - गुलाबराव रघुनाथ पाटील
- एरंडोल - अमोल चिमणराव पाटील
- पाचोरा किशोर - सिंग पाटील
- मुक्ताईनगर - चंद्रकांत निंबा पाटील
- बुलढाणा - संजय रामभाऊ गायकवाड
- मेहकर - डॉ संजय भास्कर रायमुलकर
- दर्यापुर - अभिजीत आनंदराव अडसूळ
- रामटेक- आशिष नंदकिशोर जैस्वाल
- भंडारा - नरेंद्र भोजराज भोंडेकर
- दिग्रस - संजय दुलीचंद राठोड
- नांदेड उत्तर - बालाजी देविदासराव कल्याणकर
- कळमनुरी - संतोष लक्ष्मणराव बांगर
- जालना - अर्जुन पंडितराव खोतकर
- सिल्लोड - अब्दुल सत्तार अब्दुल नबी
- छ. संभाजीनगर मध्य - प्रदिप शिवनारायण जैस्वाल
- छ. संभाजीनगर पश्चिम- संजय पांडूरंग शिरसाट
- पैठण - विलास संदिपान भूमरे
- वैजापुर - रमेश नानासाहेब बोरनारे
- नांदगाव - सुहास द्वारकानाथ कांदे
- मालेगाव बाह्य - दादाजी दगडूजी भुसे
- ओवळा माजीवाडा- प्रताप बाबूराव सरनाईक
- मागाठाणे - प्रकाश राजाराम सुर्वे
- जोगेश्वरी (पूर्व) - मनिषा रविंद्र वायकर
- चांदिवली - दिलीप भाउसाहेब लांडे
- कुर्ला- मंगेश अनंत कुडाळकर
- माहिम - सदा (सदानंद) शंकर सरवणकर
- भायखळा - यामिनी यशंवत जाधय
- कर्जत - महेंद्र सदाशिव थोरवे
- अलिबाग - महेंद्र हरी दळवी
- महाड - भरतशेठ मारूती गोगावले
- उमरगा - ज्ञानराज धोंडीराम चौगुले
- परांडा- डॉ. तानाजी जयवंत सावंत
- सांगोला - शहाजी बापू राजाराम पाटील
- कोरेगाव - महेश संभाजीराजे शिंदे
- पाटण - शंभूराज शिवाजीराव देसाई
- दापोली- योगेश रामदास कदम
- रत्नागिरी - उदय रविंद्र सामंत
- राजापूर - किरण रविंद्र सामंत
- सावंतवाडी - दीपक वसंतराव केसरकर
- राधानगरी - प्रकाश आनंदराव आबिटकर
- करवीर- चंद्रदिप शशिकांत नरके
- खानापूर- सुहास अनिल बाबर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world