Sanjay Raut Tweet: हनी ट्रॅप प्रकरणाबाबत संजय राऊतांचं खळबळजनक ट्वीट; Exclusive फोटो शेअर करत म्हणाले...

Maharashtra honey Trap Case : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विधानसभेत दिशाभूल केल्याचा आरोप करत, महाराष्ट्रात 'हनी ट्रॅप'चे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

Maharashtra honey Trap Case : राज्याच्या राजकारणात 'हनी ट्रॅप'च्या मुद्द्यावरून खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विधानसभेत दिशाभूल केल्याचा आरोप करत, महाराष्ट्रात 'हनी ट्रॅप'चे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा दावा केला आहे.

संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाराष्ट्रात 'हनी ट्रॅप' नाही असे सांगितले, पण त्यांची ही माहिती दिशाभूल करणारी आहे. राऊत यांनी एक फोटो शेअर करत, त्या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. "दुध का दूध पानी का पानी होईल!" असे म्हणत, या चौकशीतून सत्य समोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

(नक्की वाचा-  Jalgaon News: प्रफुल लोढाला अटक! हनिट्रॅपची पाळेमुळे जळगावपर्यंत? खडसेंच्या आरोपानंतर बडा नेता फसणार?)

राऊत यांच्या दाव्यानुसार, या 'हनी ट्रॅप' प्रकरणात चार मंत्री आणि अनेक अधिकारी अडकले आहेत. हे आरोप अत्यंत गंभीर असून, राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवू शकतात. विशेष म्हणजे, राऊत यांनी शिवसेनेतून फुटून शिंदे गटात सामील झालेल्या काही तरुण खासदारांनाही या 'हनी ट्रॅप'मुळेच पळावे लागले, असा दावा केला आहे. 

(नक्की वाचा - Vasai News: भाजपा नेते प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले, मोठी दुर्घटना टळली!)

संजय राऊत यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केल्याने, आता केंद्रीय तपास यंत्रणा या प्रकरणात लक्ष घालणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील विधानावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत आणि पुराव्यादाखल एका फोटोचा उल्लेख करत राऊत यांनी हे प्रकरण अधिक गंभीर बनवले आहे. या आरोपांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राऊत यांच्या या आरोपांवर मुख्यमंत्री किंवा इतर नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

काय आहे प्रकरण?

कथित हनीट्रॅप प्रकरणामध्ये 72 पेक्षा जास्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, आयएएस, आयपीएस अधिकारी, आणि काही माजी व विद्यमान मंत्री यांना अडकवल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची सुरुवात नाशिक येथून झाली, जिथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कथित संवेदनशील व्हिडिओ रेकॉर्ड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. एका महिलेच्या तक्रारीनंतर हे प्रकरण समोर आले, ज्यामध्ये तिने काही वरिष्ठ अधिकारी आणि नेत्यांच्या संशयास्पद कृतींचे व्हिडिओ असल्याचे सांगितले.

ठाणे क्राइम ब्रांचला तीन तक्रारी मिळाल्या असून, त्याची गोपनीय चौकशी सुरू आहे. एका महिलेवर आरोप आहे की, तिने उच्चपदस्थ अधिकारी आणि नेत्यांना ब्लॅकमेल करून कोट्यवधी रुपये उकळले. याबाबत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत एक पेन ड्राइव्ह दाखवून यामध्ये 72 आयएएस अधिकारी आणि माजी मंत्र्यांचा समावेश असल्याचा दावा केला.

Advertisement
Topics mentioned in this article