जाहिरात

Chhatrapati Sambhajinagar: ठाकरे गटाच्या नेत्याची शेतकऱ्याला घरी बोलावून मारहाण, VIDEO व्हायरल

Chhatrapati Sambajinagar Viral Video : सचिन घायाळांसह चौघांकडून मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी पैठण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Chhatrapati Sambhajinagar: ठाकरे गटाच्या नेत्याची शेतकऱ्याला घरी बोलावून मारहाण, VIDEO व्हायरल

Chhatrapati Sambhajinagar : ठाकरे गटाच्या उपनेत्याच्या गुंडगिरीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्यांना  शेतकऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. याप्रकरणी पैठण पोलिसांत चार जणांविरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे.  

ठाकरे गटाचे उपनेते सचिन घायाळ यांनी उसाच्या थकबाकीची मागणी केल्याने शेतकऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. राहुल कांबळे असं मारहाण झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. शेतकऱ्याला घरी बोलावून सचिन घायाळ यांनी शेतकऱ्याला मारहाण केली आहे. व्हिडीओ घायाळ शिवीगाळ करताना देखील दिसत आहेत.  

याप्रकरणी सचिन घायाळांसह चौघांकडून मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी पैठण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com