भाजप आमदार नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नितेश राणे शपथ घेताच शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी राणे कुटुंबाला संपवण्याचे टोकाचे प्रयत्न केले, पण तुम्हाला यश आले नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली.
निलेश राणे यांच्या टीकेला शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे ब्रँड आहेत आणि तुम्ही अजुनही शेंबडे आहात, अशा शब्दात सुषमा अंघारे यांनी राणेंवर हल्लाबोल केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
(नक्की वाचा- छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून का डावललं? काय आहेत कारणे?)
निलेश राणे यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं?
निलेश राणे यांनी ट्वीट करत म्हटलं की, "उद्धव ठाकरे, तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही 2005 पासून राणे कुटुंबाला संपवण्याचे टोकाचे प्रयत्न केले. काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रिपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो. पण नंतर जो प्रमाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो. उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागलात नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली."
(नक्की वाचा- "गांधी कुटुंबाने माझी कारकिर्द घडवली आणि बिघडवलीही", मणिशंकर अय्यर यांचं खळबळजनक वक्तव्य)
सुषमा अंधारे यांचे प्रत्युत्तर
सुषमा अंधारे यांनी निलेश राणे यांना उत्तर देताना म्हटलं की, "म्हणून तुम्ही अजुनही बालिश आहात. अरे मंत्री झाल्यावर मतदारांचे आभार मानायचे, पक्ष नेत्यांचे किंवा ज्या आई-वडिलांनी घडवले त्यांचे आभार मानायचे. ते सगळं सोडून उद्धव ठाकरे आठवतात. यातच ठाकरे ब्रँड आहेत आणि तुम्ही अजुनही शेंबडे आहात हे सिद्ध होते."