Kalyan News : शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखे यांचा हृदयविकाराने मृत्यू, पोलिसांच्या एका फोनमुळे..

शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखे यांच्या हृदयविकाराने मृत्यू झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan Ramesh Tikhe Death
मुंबई:

अमजद खान, प्रतिनिधी

Kalyan Ramesh Tikhe Death News : शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखे यांच्या हृदयविकाराने मृत्यू झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. बेपत्ता नगरसेवकांच्या फोटो लावताना रमेश तिखे देखील उपस्थित होते.कोळसेवाडी पोलिसांकडून वारंवार फोन येत असल्याने रमेश तिखे यांची तब्येत खालावली आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या दबावामुळे रमेश तिखे यांच्या हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी केला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोन नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार ठाकरे गटाने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात केली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असल्याने ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने पुढाकार घेऊन हे नगरसेवक बेपत्ता असल्याचे पोस्टर शहरात चिटकवले होते. याप्रकरणी मधुर म्हात्रे यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस या तक्रारीनंतर ठाकरे गटांच्या पदाधिकाऱ्यांना याप्रकरणी चौकशीसाठी बोलवण्याकरिता दबाव टाकत होते. या दबावामुळेच ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखे यांची तब्येत बिघडली आणि त्यांचा आज पहाटे हृदयविकाराने मृत्यू झाला, असा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 

नक्की वाचा >> Navi Mumbai : नवी मुंबई महापालिकेच्या महापौर निवडीची तारीख ठरली, शहरात बसणार 13 वा महापौर, 2 नावे आहेत आघाडीवर

बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर कोणी चिकटवले?

रमेश तीखे हे कल्याण पूर्व परिसरातील करपेवाडी परिसरात राहत होते. बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर चिटकवण्याच्या कामात तेही सहभागी झाले होते. बेपत्ता नगरसेवक कुठे आढळल्यास ठाकरे गटाच्या शाखेला संपर्क साधावा, अशा आशयाचा मजकूर त्या पोस्टरवर लिहिण्यात आला होता.बेपत्ता नगरसेवक प्रकरण पोस्टर चिटकवल्याने बेपत्ता नगरसेवकांची बदनामी होत असल्याचा आरोप त्यांचे नातेवाईक दिव्येश म्हात्रे यांनी केला होता. याप्रकरणी म्हात्रे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली होती. 

नक्की वाचा >> कल्याण रेल्वे स्थानकात क्षणात जीव गेला असता, पण तो प्रवासी अखेर वाचला..पोलिसाचा प्रजासत्ताक दिनी होणार सत्कार

पोलिसांनी नोटिस बजावली आणि नंतर..

या तक्रारीनंतर पोलिसांनी पोस्टर चिटकवणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती.तसेच चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहावे, असा तगादा लावला,असा आरोप ठाकरे गटाचे पदाधिकारी नीरज कुमार यांनी केला. पोस्टर लावण्या प्रकरणात ठाकरे गटाचे पदाधिकारी तिखे हे देखील सहभागी होते. पोलिसांनी त्यांना देखील नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहा असं सांगितलं होतं. पोलिसांनी हजर राहण्यास सांगितल्याने तिथे यांची प्रकृती खालावली. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेत असताना त्यांचा आज पहाटे अडीच वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. पोलिसांच्या दबावामुळेच ठाकरे गटाचे पदाधिकारी तिखे यांचा मृत्यू झाला, असा  असल्याचा आरोप ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी केला आहे.

Advertisement