
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर संपुर्ण देश हादरून गेला होता. तिचा प्रियकर आफताब पूनावाला याने तिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले होते. शिवाय हे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले होते. या प्रकरणी लेकीला न्याय मिळाला पाहीजे यासाठी तिचे वडील विकास वालकर हे संघर्ष करत होते. लेकीचे राहीलेले तुकडे आपल्याला अंत्यसंस्कारासाठी मिळावे यासाठी त्यांचा लढा सुरू होता. त्याच बरोबर तिला न्याय मिळावा म्हणून ही ते लढत होते. पण त्यांचा हा संघर्ष आणि लढा अर्ध्यावर सोडून विकास वालकर यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने वसईत निधन झाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांचे वसईत निधन झाले आहे. विकास वालकर यांचे हृदय विचाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. विकास वालकर आपल्या मुलांसोबत वसईमध्ये राहत होते. सकाळी त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी वालकर यांना रुग्णालयात पोहोचण्या अगोदरच मृत झाल्याचे घोषित केले.
देशभर गाजलेल्या श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी लढा देणारे श्रद्धांचे वडील विकास वालकर हे ही लढाई अर्ध्यावर सोडून या जगातून निघून गेले. श्रद्धा वालकर हीचा प्रियकर आफताब पूनावाला याने मे 2022 मध्ये हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे दिल्लीच्या मेहरौली जंगलात फेकले होते. दिल्ली पोलिसांनी श्रद्धाच्या मृतदेहाचे गोळा केलेले तुकडे अद्याप तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिलेले नाहीत. हे तुकडे आपल्याला अंत्यसंस्कारासाठी द्यावेत अशी मागणी श्रद्धाच्या वडीलांनी केली होती. पण त्यांची ही मागणी पुर्ण झाली नाही.
त्यांची शेवटची इच्छाही पुर्ण झाली नाही. पुढे त्यांनी आपल्या मुलीच्या आठवणीत गेल्या वर्षी "श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्ट"ची स्थापना केली होती. ही संस्था महिलांच्या सुरक्षे संदर्भात आणि पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर मदत करते. हे करत असताना लेकीला न्याय मिळवून देण्याचा त्यांचा लढा सुरूच होता. क्रुरतेची परिसीमा गाठलेल्या आणि देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकणात न्याय कधी मिळणार याची प्रतिक्षा तिच्या कुटुंबीयांना आहे.
त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी देशभरातील मुलींमध्ये जनजागृती, त्यांचं समुपदेशन आणि पीडितांना कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली होती. श्रद्धा वालकर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात असूनही दोन वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याची खंत वालकर कुटुंबीय वारंवार बोलून दाखवत होते. त्यात तिचे वडील आघाडीवर होते.त्यांचे वकील ॲड सीमा कुशवाहा यांनी त्याची बाजू लावून धरली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world