नवी मुंबई विमानतळाची सिग्नल टेस्टिंग यशस्वी, 31 ऑक्टोबरला उतरणार पहिलं टेस्टिंग विमान

सिग्नल टेस्टिंग धावपट्टी क्रमांक 28/08 वरून करण्यात आले आहे. अति मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन ही चाचणी घेण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कांबळे, नवी मुंबई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIA) 31 ऑक्टोबर रोजी चाचणीच्या आधारावर पहिले विमान उतरवले जाणार आहे. 15 दिवसांपूर्वी देखील सिग्नल टेस्टिंग झालं होतं. परंतु बदलत्या हवामानामुळे हे सिग्नल टेस्टिंग पुढे ढकलण्यात आलं होतं. ते टेस्टिंग आज करण्यात आले असून भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या विशेष विमानाने हे सिग्नल टेस्टिंग करण्यात आले आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

सिग्नल टेस्टिंग धावपट्टी क्रमांक 26/08 वरून करण्यात आले आहे. अति मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन ही चाचणी घेण्यात आली आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) ने अलीकडेच नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड ला (NMIAL) ला 'NMI' कोड प्रदान केला आहे.  विमानतळाचा पहिला टप्पा 31 मार्च 2025 पर्यंत पूर्णपणे व्यावसायिक वापरासाठी खुला होण्याची अपेक्षा आहे.

(नक्की वाचा- भुजबळांचं ओपन चॅलेंज जरांगेंनी स्वीकारलं; विधानसभा निवडणुकीची सर्वात मोठी अपडेट) 

1999 मध्ये संकल्पित झालेल्या नवी मुंबई विमानतळाचे काम 2017 मध्ये सुरू झाले.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 1160 एकर क्षेत्रफळात पसरलेले आहे.  विमानतळ प्रकल्पासाठी एकूण अंदाजे 16,700 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.   या विमानतळावर दोन रेल्वे मार्ग असून ते एकमेकांपासून दोन किलोमीटरच्या अंतरावर आहेत. NMIA हे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) मधील दुसरे विमानतळ असेल.

(नक्की वाचा - महायुतीत खडाजंगी होणार? अजित पवारांनी सार्वजनिकरित्या जाहीर केला पहिला उमेदवार!)

नवी मुंबई विमानतळ पाच टप्प्यांत उभारले जाणार आहे. टप्पा क्रमांक 1 आणि 2 एकत्रित पूर्ण केले जाणार आहे. यात एक टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे.  याअंतर्गत दोन कोटी प्रवासी प्रवास करू शकतील, असा अंदाज आहे. तर टप्पा क्रमांक 3, 4 आणि 5 मध्ये तीन टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. या टप्प्यानंतर वार्षिक 9 कोटी प्रवासी वाहतूक होईल, असा सिडकोचा अंदाज आहे.

Advertisement