Nashik News : आधी मुख्यमंत्र्यांची भेट, आता उघड नाराजी; सुधाकर बडगुजरांच्या मनात चाललंय काय?

Nashik Politics : पक्ष संघटनेत बदल करताना विचारात न घेतल्याने सुधाकर बडगुजर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महानगरप्रमुख विलास शिंदे देखील पक्षात नाराज असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. काल

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रांजल कुलकर्णी, नाशिक

Nashik News: शिवसेना ठाकरे गटातील धुसफूस थांबण्याचं नाव घेत नाही. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अनेक नेत्यांना पक्षाला राम राम ठाकला आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहेत. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य समोर आलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर पक्षात नाराज असल्याचं त्यांना स्वत: सांगितलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पक्ष संघटनेत बदल करताना विचारात न घेतल्याने सुधाकर बडगुजर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महानगरप्रमुख विलास शिंदे देखील पक्षात नाराज असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. काल म्हणजे सोमवारीच विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. संजय राऊत यांच्यावर नाराज नसल्याचं बडगुजर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

(नक्की वाचा-  Crime News : आंबे चोरीच्या संशयावरून शेतमजूराची बेदम मारहाण करत हत्या, 5 जणांना अटक)

दोनच दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. एका रुग्णालय उद्घाटन प्रसंगी ही भेट झाली होती.  त्यावर बोलताना सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं की, देवेंद्र फडवणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. शहराचे काही प्रश्न असतात ते मांडण्यासाठी  त्यांना भेटलो होतो.

(नक्की वाचा- Nitesh Rane: मुंबईत वॉटर टॅक्सी सुरू होण्याच्या हालचालींना वेग, 'इतक्या' मिनिटात गाठता येणार नवी मुंबई)

पक्षातील नाराजीवर बोलताना त्यांनी म्हटलं की, हो मी पक्षात नाराज आहे. पण मीच नाही तर 10 ते 12 जण नाराज आहेत. आम्ही नाराजी दूर करण्याच्या प्रयत्न करत आहोत. संजय राऊत यांच्यावर ही नाराजी नाही.  पक्षासाठी एवढं काम केलं की आम्ही वातावरण बदलवून खासदार निवडून आणला होता.  मात्र पक्ष संघटनेत बदल करताना विश्वासात घेतले नाही म्हणून नाराजी आहे. महानगरप्रमुख विलास शिंदे देखील नाराज आहे.

Advertisement
Topics mentioned in this article