जाहिरात

ग्रँट रोडमध्ये इमारतीचा एक भाग कोसळला, एकाचा मृत्यू तर सहा महिन्याचे बाळ बचावले

ग्रँट रोडमध्ये एक इमारतीचा भाग कोसळला आहे. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

ग्रँट रोडमध्ये इमारतीचा एक भाग कोसळला, एकाचा मृत्यू तर सहा महिन्याचे बाळ बचावले
मुंबई:

मुंबईत आज सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. शिवाय पुढील 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी भरण्याच्या घटनाही घडल्या आहे. तर ग्रँट रोडमध्ये एक इमारतीचा भाग कोसळला आहे. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर सहा महिन्याच्या बाळाला वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. तिन जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी भाटीया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ग्रँट रोड रेल्वे स्टेशन बाहेर रुबीनिसा मंझिल ही इमारत आहे. चार मजली असलेली ही इमारत ग्रँट रोडच्या स्लेटर रोड वर आहे. ही इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती. त्यानुसार म्हाडाने नोटीस ही बजावली होती. त्यानंतरही या इमारतीत रहिवाशी राहात होते. शनिवारी सकाळी अकरा वाजता अचानक या इमारतीचा एक भाग कोसळला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरच्या स्लॅबचा भाग कोसळला होता. 

ट्रेंडिंग बातमी - मुंबईत जोरदार पाऊस, पुढील 24 तासात धो-धो बरसणार

ज्यावेळी हा भाग कोसळला तेव्हा पाच ते सहा कुटुंब चौथ्या मजल्यावर अडकली होती. अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य सुरू केले. काही लोक इमारतीत अडकले होते. यावेळी एका सहा महिन्याच्या बाळाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. तर आणखी काही जण इमारतीत अडकले असल्याचे भीती व्यक्त केली जात आहे. एका व्यक्तीच्या अंगावर स्लॅब पडला होता. त्याचा व्हिडीओ ही व्हायरल झाला आहे. दरम्यान सध्या बचाव कार्य सुरू आहे. 

                                                                

Switch To Dark/Light Mode
Previous Article
Gautam Adani Success Story : 16 व्या वर्षी पहिल्यांदा सीमा ओलांडली, गौतम अदाणींनी सांगितलं यशाचं रहस्य
ग्रँट रोडमध्ये इमारतीचा एक भाग कोसळला, एकाचा मृत्यू तर सहा महिन्याचे बाळ बचावले
Ajit pawar on mukhyamantri ladki bahin yojna in pune balewadi program
Next Article
'पु्न्हा सरकार आलं तर महिलांना 90 हजार रुपये देऊ'; अजित पवारांचं महिलांना मोठं आश्वासन