
निनाद करमरकर, उल्हासनगर
Ulhasnagar News : शिवसेना शाखेत कौंटुबिक वाद मिटवायला गेलेल्या दोन गटात तुफान राडा झाला आहे. उल्हासनगरमधील शिवेसना ठाकरे गटाच्या शाखेबाहेर हा वाद झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. आरोपींचा शोध सुरू आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उल्हासनगरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखेत कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आलेल्या दाम्पत्याने एकमेकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सासरच्यांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी झाला आहे.
(नक्की वाचा - Hamid Engineer: मोदींना भेटले, प्रकाशझोतात आले, आता दंगलीसाठी अटक, 'ते' हमीद इंजिनिअर कोण?)
वैभव देवधर आणि प्राची हे पती-पत्नी असून कौटुंबिक वादामुळे ते विभक्त राहतात. त्यांच्यातले वाद मिटवण्यासाठी कुटुंबीयांनी उल्हासनगरचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्या शाखेत एकमेकांना बोलावलं होतं.
(नक्की वाचा- Emotional story: आई वडील भारतात, इंजिनिअर लेकाला मुस्लीम देशात अटक, प्रकरण काय?)
मात्र यावेळी पती-पत्नीत वाद होऊन शिवसेनेच्या शाखेबाहेरच हाणामारी झाली. यावेळी प्राचीच्या भावाने बहिणीच्या पतीवर तीक्ष्ण हत्याराने वार केले, या घटनेत प्राचीचा पती वैभव हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world