जाहिरात

Accident News : भरधाव कारने 6 जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Chhatrapati Sambhajinagar Accident News : छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोतील काळा गणपती मंदिरासमोर हा भीषण अपघात झाला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे.

Accident News : भरधाव कारने 6 जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Chhatrapati Sambhajinagar Accident: छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोतील काळा गणपती मंदिरासमोर भीषण अपघात झाला आहे. एका चारचाकी कारने 6 जणांना उडवले आहे. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

(नक्की वाचा -  Pune News : अमित शाहांच्या दौऱ्यादरम्यान झाडाझडती, एकाकडे सापडली पिस्तुल आणि काडतुसे)

शहरातील हा महत्त्वाचा भाग असल्याने नेहमीच या ठिकाणी वर्दळ असते. सोबतच सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आणि मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. दरम्यान उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार एक कारमधून तरुण अचानक वेगाने येऊन आधी रस्त्यावरील दुचाकींना धडकला, त्यानंतर रस्त्यावर असलेल्या पायी जाणाऱ्या लोकांना त्याने धडक दिली.

अपघात एवढा भीषण होता की कारचे धडकेने लोक अक्षरशः हवेत उडाले. घटनास्थळी आता पोलीस पोहचले असून, पंचनामा केला जात आहे. तसेच कारने धडक देणाऱ्या तरुणाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

(नक्की वाचा-  Maharashtra Assembly Session 2025: पुणे शहराची वाहतूक कोंडीतून होणार सुटका? मंत्री माधुरी मिसाळांनी सांगितला प्लॅन)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळा गणपती मंदिरासमोर एका भरधाव कारने भाविकांना आणि मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या एकूण 6 जणांना उडवलं. तीन जणांना मिनी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर तीन जणांना एमजीएम रुग्णालात दाखल करण्यात आलं आहे. घटनेनंतर चालक फरार झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com