जाहिरात

Nalasopara Accident: भरधाव ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, बाप-लेकाचा जागीच मृत्यू, अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

Shocking Accident Viral Video : मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार परिसरात आज रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. या अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झालाय.

Nalasopara Accident: भरधाव ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, बाप-लेकाचा जागीच मृत्यू, अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
Nalasopara Truck Accident
मुंबई:

मनोज सातवी, प्रतिनिधी

Shocking Accident Viral Video : मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार परिसरात आज रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. भरधाव आणि अनियंत्रित ट्रकने पेट्रोल पंपाजवळ उभ्या रिक्षा व मोटरसायकलला जबर धडक दिल्याने रिक्षातील बाप–लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सहजाद उस्मानी आणि त्यांचा मुलगा आतिफ उस्मानी अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही नालासोपारा येथे राहत होते. ट्रकने दिलेल्या धडकेत मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्या हायवेवर नेमकी चूक कोणाची? कसा झाला अपघात?

या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भरधाव ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर रिक्षाचा चक्काचूर झाला. या घटनेनंतर पेल्हार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रिक्षा आणि मोटारसायकलला मोठी धडक दिली. ट्रकची धडक इतकी जोरदार होती की, रिक्षाचा चक्काचूर झाला. त्या रिक्षात असलेल्या बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. 

नक्की वाचा >> Video : "फॉरेनची पाटलीण..", ट्रॅफिकमध्ये ऑस्ट्रेलियन महिलेसोबत कॅब ड्रायव्हरने असं काही केलं..सर्वच थक्क झाले!

गेल्या काही दिवसांत वसई–विरार परिसरात अशा अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच नालासोपारा फाटा येथे कंटेनर कोसळून दोनजण जखमी झाले होते, तर बोईसर आणि वसई परिसरात झालेल्या वेगवान वाहनांच्या धडकेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

नक्की वाचा >> बॉलिवूडच्या फेमस अभिनेत्रीच्या पित्यानं स्वत:च्याच बहिणीशी केलं होतं लग्न! माधुरी दीक्षितवरही होता क्रश

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com