भारतीय वायुसेनेचे स्क्वाड्रन लीडर (आयएएफ) (Squadron Leader of the Indian Air Force) विजयकुमार ज्ञानेश्वर झेंडे यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय वायुसेनेते अधिकारी असलेले विजयकुमार 36 वर्षांचे होते. ते पुरंदरचे रहिवासी होते. सध्या ते नागालँडमध्ये तैनात होते. त्यांच्या निधनानंतर पुरंदर तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे.
झेंडे यांच्या पार्थिवावर मूळ गावी दिवे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आयएएफ आणि भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकारी आणि जवान उपस्थित होते. आयएएफ (Vijayakumar Dnyaneshwar Zende died of dengue) अधिकारी विजयकुमार यांच्या मूळ ठिकाणी रजेवर असताना त्यांना डेंग्यूची लागण झाली होती.
नक्की वाचा - मुसळधार पावसाचा पोलीस भरतीला फटका; अकोला, पुण्यातील मैदान चाचणी पुढे ढकलली
स्क्वॉड्रन लीडर विजयकुमार झेंडे भारत-रशिया संयुक्त युद्ध सरावात सहभागी झाले होते. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी इंडोनेशियातून ऑक्सिजनची वाहतूक करण्याचे महत्त्वाचे काम हाती घेतले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ, बहीण, काका असा परिवार आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर झेंडे पोलीस दलातून एसडीपीओ म्हणून निवृत्त झाले आहेत.
गेल्या चार-पाच दिवसांपासून झेंडे आजारी होते. त्यांचा डेंग्यूची लागण झाल्यामुळे सासवड येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र तब्येत अधिक ढासळल्यामुळे त्यांना पुढे येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही. यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world