जाहिरात

बिस्किटमधून विद्यार्थ्यांना विषबाधा, छत्रपती संभाजीनगरमधील जि.प. शाळेतील घटना

बिस्कीट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या होऊ लागल्या. तर अनेक विद्यार्थ्यांना अचानक ताप आला. सर्व विद्यार्थ्यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बिस्किटमधून विद्यार्थ्यांना विषबाधा, छत्रपती संभाजीनगरमधील जि.प. शाळेतील घटना

छत्रपतील संभाजीनगमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.  पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत ही घटना घडली आहे. सुमारे 50 विद्यार्थ्यांना बिस्किटातून  विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे.

शनिवार असल्याने शाळेत बिस्कीट वाटप करण्यात आले होतं. हे बिस्कीट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या होऊ लागल्या. तर अनेक विद्यार्थ्यांना अचानक ताप आला. सर्व विद्यार्थ्यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे पालकही संतप्त झाले आहे. सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Ayushman Bharat : मोदी सरकारचा मोठा निर्णय, 70 वर्षांवरील नागरिकांना होणार फायदा
बिस्किटमधून विद्यार्थ्यांना विषबाधा, छत्रपती संभाजीनगरमधील जि.प. शाळेतील घटना
Badlapur action will be taken against school administrators Chief Minister Eknath Shinde warns
Next Article
बदलापुरातील शाळा संस्थाचालकांवर कारवाई करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा