
मोसिन शेख, छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर ऊस वाहतूक करणारा ट्रक उलटून झालेल्या अपघातात 6 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर 11 जण जखमी झाले आहेत. पिशोर घाट परिसरात उसाने भरलेला ट्रक कन्नडहून पिशोरला जात असताना ही घटना घडली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ट्रकमध्ये 17 मजूर होते. पिशोर घाटात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. काही मजूर ट्रकच्या वर बसले होते. त्यामुळे अपघातानंतर कामगार रस्त्यावर पडले आणि उसाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
(नक्की वाचा- Pune Politics : पुण्यात काँग्रेसला खिंडार; बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार)
अपघातात चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर 13 जणांना जखमी उपस्थेत बाहेर काढण्यात आले. तातडीने जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे 2 मजूरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
(नक्की वाचा- Raj Thackeray Speech : "अंधश्रद्धेतून बाहेर या", राज ठाकरेंनी 'महाकुंभ'च्या पवित्र स्नानाची उडवली खिल्ली)
मृत्यू झालेल्यांची नावे
- किसन धन्नू राठोड
- मनोज नामदेव चव्हाण
- विनोद नामदेव चव्हाण
- मिथुन महारू चव्हाण
- कृष्णा मुलचंद राठोड
- ज्ञानेश्वर देविदास चव्हाण
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world