Sunetra Pawar News: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय भूमिका मांडणार? 9 फेब्रुवारीकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष

Sunetra Pawar News: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 9 फेब्रुवारी रोजी आपली भूमिका मांडणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Sunetra Pawar News: सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष"
PTI

- मोसीन शेख, प्रतिनिधी

Sunetra Pawar News: उपमुख्यमंत्री (दिवंगत) अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणाची समीकरणं बदलली आहेत. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुनेत्रा पवार यांच्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झालीय. यादरम्यान सुनेत्रा पवार 9 फेब्रुवारीनंतर आपली भूमिका महाराष्ट्रासमोर मांडणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आलीय. 9 फेब्रुवारीनंतर सुनेत्रा पवार नेमकं काय बोलणार, कोणत्या मुद्यावर बोलणार, राजकीय समीकरणांबाबत काय सांगणार? याकडे राजकारण्यासह सर्वसामान्यांचंही लक्ष लागलं आहे. त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी उत्सुकता निर्माण झालीय. 

(नक्की वाचा: Ajit Pawar Tattoo Video: निव्वळ प्रेम आणि निष्ठा! तरुणाने छातीवर काढला अजित पवारांचा टॅटू)

सुनेत्रा पवार 9 तारखेपर्यंत कोणतीही भूमिका मांडणार नाहीत

सूत्रांच्या माहितीनुसार, 9 फेब्रुवारीपर्यंत सुनेत्रा पवार बारामतीतच थांबणार आहेत. या काळात त्या कोणत्याही राजकीय मंचावर सक्रिय भूमिका घेणार नाहीत किंवा माध्यमांसमोर आपली बाजू मांडणार नाहीत. बारामती हे पवार कुटुंबीयांचे राजकीय केंद्र मानले जाते. त्यामुळे याच ठिकाणाहून सुनेत्रा पवार आपली पुढील दिशा ठरवली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(नक्की वाचा: Ajit Pawar Death News : अजित पवारांचा अपघात, मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं? अमोल मिटकरींच्या मागणीने खळबळ)

9 फेब्रुवारीपर्यंत अजित पवार यांच्या निधनास 12 दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळे घरातील दुखवटा संपल्यानंतरच भूमिका मांडण्याचा निर्णय सुनेत्रा पवार यांनी घेतल्याचं दिसतंय. त्यांच्या भूमिकेची प्रतीक्षा केवळ बारामतीतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात लागून राहिली आहे.