
26 मे रोजी झालेल्या पावसामुळे नागरिकांनी धांदल उडाली. पहिल्याच पावसात मुंबई महानगरपालिकेच्या कामाची पोलखोल झाली आहे. पहिल्याच पावसात वाहतुकीचा बोजवारा उडाला, भूमिगत मेट्रोमध्ये पाणी शिरलं, रेल्वे सेवा कोलमडली. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून पावसाळ्या आधीची कामं केली नसल्याचा आरोप केला जात आहे. काल 26 मे रोजी आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली. यादरम्यान विक्रोळीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली उभ्या असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. 26 वर्षीय तेजस नायडू हा विक्रोळीतील गणेश मैदान परिसरात दोन मित्रांसोबत उभा होता. त्यावेळी जीर्ण झालेलं झाड तेजस नायडू यांच्या अंगावर कोसळलं. यानंतर त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आजूबाजूच्या लोकांना बोलावलं. यावेळी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तेजसच्या अंगावर पडलेले झाड कापलं आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेनं तेजसच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.
नक्की वाचा - Mumbai Metro 3 : मुंबईच्या भूमिगत मेट्रो 3 मध्ये अक्षरश: तळं; पण इतकं पाणी आलं कुठून? प्रशासनानेच सांगितलं कारण
नेमकं काय घडलं?
विक्रोळीच्या गणेश मैदान परिसरामध्ये सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास 26 वर्षीय तेजस नायडू मित्रांसोबत उभा होता. यावेळी पावसामुळे जीर्ण झालेलं झाड तेजस नायडू याच्या अंगावर कोसळलं. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तेजसच्या अंगावर पडलेले झाड कापलं आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world