मुंबई ठाकरे गटाला मोठा धक्का, आणखी एका नगरसेविकेचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

Mumbai Politics : संध्या दोशी पहिल्या दोन टर्म राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. 2016 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीच्या शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून निवडून त्या आल्या.  

Advertisement
Read Time: 2 mins

अक्षय कुडकेलवार, मुंबई

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका, शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या माध्यमातून संध्या दोशी शिवसेनेते प्रवेश करणार आहे. दोशी यांचा पक्षप्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षावर पार पडणार आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संध्या दोशी पश्चिम उपनगरातील उबाठाचा महत्वाचा चेहरा आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये हा मोठा धक्का मानला जातो. संध्या दोशी या मुंबई महानगरपालिका वार्ड क्रमांक 18 मधून तीन वेळा नगरसेविका राहिल्या आहेत. 

(नक्की वाचा- मोठी बातमी! मविआचं जागा वाटप ठरलं, मुंबईतल्या 99 टक्के जागांवर सहमती)

संध्या दोशी पहिल्या दोन टर्म राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. 2016 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीच्या शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून निवडून त्या आल्या.  

(नक्की वाचा - लखपती दीदींसाठी मोदी आज जळगावात, एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबाबत अखेर पूर्णविराम!)

सध्या दोशी या मागाठणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या निकटवर्तीय नगरसेवकांपैकी एक मानल्या जातात. यापूर्वीच या भागातील रिद्धी खुरसुंगे आणि गीता काशीद या दोन नगरसेविकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

Advertisement

Topics mentioned in this article