जाहिरात
This Article is From Sep 10, 2024

Thane Accident : ठाण्यात एसटी बसची मेट्रोच्या पिलरला धडक, अनेक प्रवाशी जखमी

Thane ST bus Accident : अपघातग्रस्त बस आंबेजोगाईहून  बोरीवली येथे येत होती. सदर बसमध्ये एकूण 13 प्रवासी प्रवास करत होते. या एसटी बसने मेट्रोच्या पिलरला धडक दिल्याने हा अपघात झाला. 

Thane Accident : ठाण्यात एसटी बसची मेट्रोच्या पिलरला धडक, अनेक प्रवाशी जखमी

ठाण्यात एसटी महामंडळाची बस मेट्रोच्या पिलरला धडकल्याची घटना समोर आली आहे. घोडबंदर रोडवरील ओवळा याठिकाणी ही घडना घडली आहे. बच चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली आहे. या अपघातात 8 प्रवाशी जखमी झाले आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घोडबंदर रोडवर ओवळा परिसरात ही घटना घडली. अपघातग्रस्त बस आंबेजोगाईहून  बोरीवली येथे येत होती. सदर बसमध्ये एकूण 13 प्रवासी प्रवास करत होते. या एसटी बसने मेट्रोच्या पिलरला धडक दिल्याने हा अपघात झाला. 

(नक्की वाचा - कल्याण-डोंबिवली महापालिकेला भ्रष्टाचाराची कीड, अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा VIDEO आला समोर)

घटनेची माहिती मिळाल्यानंतर कासारवडवली पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामध्ये 13 प्रवाशांपैकी 8 प्रवाशांना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी टायटन हॉस्पिटल व ब्रह्मांड हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जखमीची नावे 

  • के. अडसूळ (बस चालक)
  • चाटे(बस वाहक)
  • उद्धव चौरे
  • उर्मिला चौरे
  • सलीम शेख
  • आत्माराम शेजुळ
  • राजश्री शेजुळ 
  • आकांक्षा शेजुळ

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: