रिझवान शेख, प्रतिनिधी
Thane News : ठाणे महापालिकेच्या डॉक्टर शारमिंग डिंगा यांनी राहत्या घराच्या इमारतीवरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. हकीम अजमल खान रुग्णालयात शारर्मिंग डिंगा डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. ग्रेस स्कोअर बिल्डिंगमधून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टर शारमिंग डिंगा यांनी कशा मुळे आत्महत्या केली आहे हे अद्याप पर्यंत कळू शकलेलं नाही. डॉक्टरांचं पार्थिव शरीर पोस्टमोर्टमसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
शारमिंग डिंगांसोबत नेमकं काय घडलं?
मुंब्रा येथील विले येथे ठाणे महापालिकेचं हकीम अजमल रुग्णालय आहे. या रुग्णालयात मुंब्रा त्याचबरोबर कौसा परिसरातील मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी हकीम अजमल रुग्णालयांमध्ये येत असतात. हकीम अजमल म्हणाले, शारमिंग डिंगा डॉक्टर म्हणून कार्यरत होती. शारमिंग डिंगा ही मुंब्रा येथील एमएम विले येथील ग्रेस स्कोअर बिल्डिंगमध्ये आपल्या कुटुंबाबरोबर राहतात.
डॉक्टर शारमिंग डिंगा यांना ३ मुलं आहे. शारमिंग डिंगा यांचे पती परदेशात नोकरी करतात. शारमिंग डिंगा ही हकीम अजमल रुग्णालयात काम करताना सर्वांबरोबर मिळून मिसळून राहत होत्या. त्याशिवाय कधीच शारमिंग डिंगा यांची कोणा बरोबर भांडण देखील झाली नसल्याची माहिती देखील समोर येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world