जाहिरात

Mumbai News : अभिनेत्यांनाही टाकलं मागे, 5 रुपये सांगून कंपनीला तब्बल 20 लाखांना चुना, नेमकं काय घडलं?

मुंबईत सायबर फसवणुकीचं एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे.

Mumbai News : अभिनेत्यांनाही टाकलं मागे, 5 रुपये सांगून कंपनीला तब्बल 20 लाखांना चुना, नेमकं काय घडलं?

Mumbai News : मुंबईत सायबर फसवणुकीचं एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. येथे काही अज्ञात सायबर गुन्हेगारांनी भारतीय सैन्याचा लोगो आणि बनावटी जीएसटी प्रमाणपत्रांचा वापर करीत एका खासगी कंपनीकडून २०,८८,५८५ रुपयांची फसवणूक केली आहे. यासाठी सायबर गुन्हेगारांनी तक्रारदारांकडून आधी पाच रुपये ट्रान्सफर करायला सांगितले आणि या व्यवहाराच्या आधारावर कंपनीच्या खात्यातून स्वत:च्या खात्यात २०.८८ लाखांहून अधिक रक्कम जमा करून सायबर गुन्हा केला. सेंट्रल सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार समीर वायंगणकर (४६) लोअर परेल येथील एका खासगी कंपनीत अकाऊंट एग्जिक्युटिव्हच्या पदावर काम करतात. फेब्रुवारी महिन्यात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकांना व्हॉट्सअप कॉल आला होता. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वत:ला भारतीय सैन्याच्या कलिना मिलिट्री कॅम्पचे अधिकारी कुणाल चौधरी असल्याचं सांगितलं. सैन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पाणीच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतील केमिकल खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

नक्की वाचा - नाव पत्नीचं फोटो मात्र प्रेयसीचा; व्यावसायिकाला मिळाली आयुष्यभराची अद्दल, लॉजवर नेमकं काय घडलं?

बनावट खरेदी आदेश, बनावट जीएसटी प्रमाणपत्रे 

एफआयआरनुसार, आरोपींनी भारतीय लष्कराचा लोगो असलेले बनावट खरेदी आदेश, बनावट जीएसटी प्रमाणपत्रे आणि संरक्षण मंत्रालयाच्या नावाने ईमेल पाठवून कंपनीचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला, आरोपींनी 5 रुपयांच्या पेमेंटची मागणी केली. नंतर, विविध बहाण्यांनी त्यांनी कंपनीच्या विविध बँक खात्यांमधून निधी मिळवला. अशाप्रकारे, आरोपींनी संचालकांना विविध कागदपत्रे दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला आणि कंपनीकडून त्यांच्या खात्यात 20.88 लाखांहून अधिक रक्कम हस्तांतरित करून घेतली.


गुगल सर्चवरुन लक्षात आलं फसवणुकीचं सत्य...

पीडितेनुसार, रक्कम पाठविल्यानंतर सामानाच्या सप्लायची कोणतीही प्रक्रिया सुरू झाली नाही त्यावेळी कंपनीला संशय आला. गुगल सर्च केल्यानंतर सैन्याच्या नावाखाली अशी प्रकारे फ्रॉडची प्रकरणं समोर आल्याचं कळालं. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com