जाहिरात

Thane Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घराशेजारी माथेफिरूचा धुमाकूळ, 10-12 गाड्या फोडल्या; ठाणेकर दहशतीत

Thane News: ठाण्यातील नितीन सिग्नल येथील ग्रीन रोडवर एका माथेफिरूने 10 ते 12 गाड्यांची तोडफोड केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या जवळच ही घटना घडल्याने खळबळ उडाली असून रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

Thane Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घराशेजारी माथेफिरूचा धुमाकूळ, 10-12 गाड्या फोडल्या; ठाणेकर दहशतीत
"Thane News: ठाण्यात माथेफिरूचा धुमाकूळ, 10-12 गाड्या फोडल्या"
NDTV Marathi

- रिजवान शेख, प्रतिनिधी

Thane News: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या ठाण्यात सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नितीन सिग्नल जवळील ग्रीन रोड परिसरात एका माथेफिरूने जोरदार धुमाकूळ घातला. या माथेफिरूने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 10 ते 12 गाड्यांची तोडफोड केली, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन सिग्नल येथील ग्रीन रोड परिसरात हा माथेफिरू अचानक तोडफोड करण्यास सुरुवात केली. काहीही कारण नसताना त्याने रस्त्यावरील वाहनांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. यामध्ये केवळ खासगी कारच नाही, तर रुग्णवाहिका (Ambulance) आणि मालाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचेही मोठे नुकसान झाले आहे. वाहनांच्या काचा फोडल्यामुळे रस्त्यावर काचांचा खच पडला आहे.

(नक्की वाचा: Ashok Kharat News: भोंदू अशोक खरातच्या मुलीकडे 100 कोटींच्या संपत्तीचे घबाड? तृप्तबालाच्या SIT चौकशीत मोठे खुलासे होण्याची शक्यता)

अतिसंवेदनशील परिसरात सुरक्षा वाऱ्यावर?

धक्कादायक बाब म्हणजे ही घटना ज्या ठिकाणी घडली तेथून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान अतिशय जवळ आहे. हा परिसर अतिसंवेदनशील मानला जातो आणि येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो. अशा हाय-प्रोफाइल भागात एका माथेफिरूने एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या फोडल्यामुळे सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

(नक्की वाचा: Navi Mumbai News: नवी मुंबई हादरली! मध्यरात्री बाइकवरून आला, एकावर 4 गोळ्या झाडल्या अन्... ऐरोलीत दहशत)

नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. या तोडफोडीत वाहनधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून रहिवाशांनी या परिसरात पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

Thane Breaking News | DCM Eknath Shinde यांच्या घराजवळच माथेफिरुकडून वाहनांची तोडफोड VIDEO

Listen to the latest songs, only on JioSaavn.com