जाहिरात

Mumbai News: दादर पश्चिम-दादर पूर्वेला जोडणारा एल्फिन्स्टन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?

दादर वाहतूक विभागाच्या हद्दीतील दादर पश्चिम व दादर पूर्व यांना जोडणारा एल्फिन्स्टन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहने पूर्णत: टिळक ब्रिज व करी रोड ब्रिजकडे वळवण्यात आली आहेत.

Mumbai News: दादर पश्चिम-दादर पूर्वेला जोडणारा एल्फिन्स्टन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?
Dadar Elphinstone Flyover Closed For Transportation
मुंबई:

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी 

Mumbai Traffic Alert News:  दादर वाहतूक विभागाच्या हद्दीतील दादर पश्चिम व दादर पूर्व यांना जोडणारा एल्फिन्स्टन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहने पूर्णत: टिळक ब्रिज व करी रोड ब्रिजकडे वळवण्यात आली आहेत. त्यामुळे दादर वाहतूक विभागातील भवानी शंकर मार्ग व एस.के.बोले मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने या रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाचा सविस्तर माहिती.

मुंबईतील वाहतूक बदल खालीलप्रमाणे

1) भवानी शंकर रोड एकेरी मार्ग (One Way) करण्यात आला आहे.
2) हनुमान मंदिराकडून गोपीटँककडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश निर्बंध.

पर्यायी मार्ग:  गोपीनाथ चव्हाण चौकातून हनुमान मंदिर व कबुतरखाना येथे येण्यासाठी गोपीनाथ चव्हाण चौकाकडून गोखले रोडने-झाकादेवी जंक्शन-पोर्तुगीज चर्च जंक्शन-उजवे वळण-पोर्तुगीज चर्च-हनुमान मंदिर-डावे वळण-पानेरी जंक्शन-कोतवाल गार्डनला वळसा घेऊन-पानेरी जंक्शन-हनुमान मंदिराकडून पुढे कबुतरखानाकडे जाता येईल.

नक्की वाचा >> Kalyan News: कसारा रेल्वे स्थानकात मोठा अनर्थ टळला, 'या' एक्स्प्रेसमधून अचानक निघाला धूर, व्हिडीओ व्हायरल

गोपीटँक → कबुतरखाना → भवानी शंकर रोड → पेंढारकर चौक → जनकदेव रोड → भवानी मंदिर → नवेद वळण → भवानी शंकर रोड.

वाहतूक बदल – 2

  • एस. के. बोले रोडवर वाहतूक दिशाबदल लागू.

  • हनुमान मंदिराकडून पेंढारकर चौककडे जाणारी वाहतूक प्रभावित.

पर्यायी मार्ग:  हनुमान मंदिर येथून पोर्तुगीज चर्चकडे जाण्यासाठी हुनमान मंदिर-भवानी शंकर रोडने-कबुतरखाना-चितळे पथ क्रॉस-आगाशे पथ क्रॉस-बाबूराव परुळेकर मार्ग क्रॉस-गोपीनाथ चव्हाण चौकाला वळसा घालून पुढे गोखले रोडने-झाकादेवी जंक्शन-पोर्तुगीज चर्च जंक्शनकडे येता येईल.

हनुमान मंदिर → भवानी शंकर रोड → कबुतरखाना → टिळक पूल प्रवेश → आगाशे पथ → बाह्यवळण → गोपीटँक → भवानी शंकर रोड → पुढील मार्ग.

नक्की वाचा >> Trending Video: प्रेमात धोका, होणाऱ्या नवऱ्याने घेतला बदला..सोशल मीडिया स्टार रोनिशाने उचललं टोकाचं पाऊल

  1. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा.
  2. वाहतूक पोलीस सूचनांचे पालन करणे आवश्यक.
  3. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com