रोहीत शर्मासह 'या' चार खेळाडूंचा विधीमंडळात होणार सत्कार

टीम इंडिया मुंबईला येणार आहे. मुंबईत ओपन बसमधून त्यांचे स्वागत केले जाईल.बीसीसीआयने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यानंतर राज्य सरकारनेही संघातील मुंबईकर खेळाडूंचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणारी टीम इंडिया भारतात दाखल झाली आहे. सर्वात आधी टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर टीम इंडिया मुंबईला येणार आहे. मुंबईत ओपन बसमधून त्यांचे स्वागत केले जाईल.बीसीसीआयने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यानंतर राज्य सरकारनेही संघातील मुंबईकर खेळाडूंचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैयस्वाल आणि पारस म्हांब्रे यांचा विधीमंडळात सत्कार केला जाणार आहे. अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही त्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे या खेळाडूंचा सत्कार विधीमंडळात होईल. सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
   
गुरूवारी पहाटे टीम इंडिया दिल्लीत दाखल झाली. त्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सर्व खेळाडूंनी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली. या भेटीनंतर टीम इंडिया मुंबईत दाखल होणार आहे. यानंतर मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडीअमपर्यंत स्वागत परेड काढली जाणार आहे. ओपन बस मधून ही परेड असेल. बीसीसीआयने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानंतर विधीमंडळातही या खेळाडूंचे स्वागत केले जावे अशी मागणी आमदारांनी लावून धरली. तर एका कार्यक्रमाचे आयोजन केले जावे अशी मागणी रोहित पवार यांनीही केली होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही याबाबत सरकारने विचार करावा असे निर्देश दिले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याला दुजोरा देत मुंबईकर रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैयस्वाल आणि पारस म्हांब्रे यांच्या सत्कार करणार असल्याचे स्पष्ट केले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री दाखवा अन् 1 गावठी कोंबडा, वलगणीचे मासे बक्षीस मिळवा'

टीम इंडियाने टी ट्वेटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला होता. अतिशय अटीतटीच्या सामन्यात भारताने शेवटच्या क्षणी दक्षिण अफ्रिकेला मात दिली. त्यानंतर संपुर्ण भारतात एकच जल्लोष होता. खेळाडूंचाही आनंद गगनात मावेना झाला होता. त्यामुळे हा विजय अविस्मर्णीय करण्यासाठी आता बीसीसीआय पुढे सरसावली आहे. त्यानुसार मुंबईत जय्यत तयारी केली जात आहे.     

Advertisement