सूरज कसबे, प्रतिनिधी
Pune Traffic Jam News : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयटी पार्क हिंजवडी येथे आज मेट्रोचे काम सुरू असताना क्रेनमध्ये एक कामगार अडकल्याची दुर्देवी घटना घडली. या घटनेमुळे मेट्रो स्थानकाखालील वाहतुकीचा मोठा खोळंबा उडाला.. काही वेळ परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळताच मेट्रो प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कामगाराला सुरक्षित बाहेर काढले.
नेमकी घटना काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात मेट्रोच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या क्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काम करताना एक कामगार उंचावर अडकला. ही बाब लक्षात येताच मेट्रो प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कामगाराला सुखरूप खाली आणण्यासाठी युद्धपातळीवर बचाव मोहीम राबवण्यात आली.
नक्की वाचा >> अमेरिकेत गेलेल्या IIT ग्रॅज्युएटला आला वेगळाच अनुभव, भारतीयांनी USA ला जावं की नाही? पोस्ट वाचून तुम्हीच ठरवा
वाहतुकीवर परिणाम आणि प्रशासकीय कारवाई
बचाव कार्यादरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून मेट्रो स्थानकाखालून जाणारी मुख्य वाहतूक थांबवण्यात आली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने पोलिसांनी तातडीने मुख्य रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करून गर्दीवर नियंत्रण मिळवले. प्रशासनाच्या यशस्वी प्रयत्नांनंतर अडकलेल्या कामगाराला सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. त्यानंतर पर्यायी मार्गावरून जाणारी वाहतूक पुन्हा मुख्य रस्त्यावर सुरू करण्यात आली. सध्या हिंजवडीतील वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाली आहे,अशी माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world