जाहिरात

Mumbai Traffic Jam : मुंबईतील रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी; कोणत्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा?

उपनगरांना मुंबईशी जोडणाऱ्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस फ्री वेवर देखील काही ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळात आहे.  वांद्रे-वरळी सी लिंकवर देखील मोठा वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. 

Mumbai Traffic Jam : मुंबईतील रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी; कोणत्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा?

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. बुधवारी पावसामुळे मुंबईकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. हवामान विभागाकडून 26 सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होतं.  मात्र अपेक्षित पाऊस झाला नाही. कालच्या विश्रांतीनंतर पावसाने पु्न्हा एकदा हजेरी लावली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पहाटेपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईच्या रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंबईतील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गूगल मॅपनुसार मुंबईतील कोणत्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी आहे यावर एक नजर टाकूया. 

 ( Maharashtra Rain Update : मुसळधार की रिमझिम, मुंबई, ठाण्यात आज काय आहे पावसाचा अंदाज? )

उपनगरांना मुंबईशी जोडणाऱ्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस फ्री वेवर देखील काही ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळात आहे.  वांद्रे-वरळी सी लिंकवर देखील मोठा वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. 

कोणत्या महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक कोंडी? 

  • जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड
  • हिरानंदानी लिंक रोड
  • एमएम जोशी मार्ग
  • लाल बहादूर शास्त्री मार्ग (LBS रोड)
  • वेस्टर्न एक्स्प्रेस फ्री वे
     
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: