- नागपूरच्या धंतोली परिसरातील परसवानी कुटुंबातील पाच सदस्य अचानक बेपत्ता झाले
- गायब झालेल्या सदस्यांमध्ये 57 वर्षीय हर्षा परसवानी आणि 12 वर्षीय कृष्णा यांचा समावेश आहे
- कुटुंब २४ जूनपासून घरातून निघून गेले असून त्यांचा शेवटचा फोन लोकेशन पुणे असल्याचे समोर आले आहे
धक्कादायक आणि तेवढीच चमत्कारी घटना नागपूरात घडल्याचं समोर आलं आहे. नागपूरातून एक कुटुंबच्या कुटुंबं चमत्कारी पद्धतीने गायब झालं आहे. त्याचा सध्या कोणत्या ही आतापत्ता लागत नाही. याच कुटुंबातील एका सदस्याच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर तर या प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे. नागपूरचं असलेलं हे कुटुंब पुण्यात असल्याचं त्यांच्या शेवटच्या फोन लोकेशनवरून समोर आलं आहे. त्यामुळे ते पुण्यात कशाला गेला हा प्रश्न वाढला आहे. शिवाय कुटुंब गायब होण्या मागचं गुढ ही वाढलं आहे.
नागपूरच्या धंतोली परिसरात परसवानी यांचे कुटुंब राहते. त्यांच्या कुटुंबात एकूण पाच जण आहेत. हे पाच ही जण अचानक बेपत्ता झाले आहेत. याची माहिती समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 71 वर्षीय श्यामसुंदर परसवानी यांनी धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. श्यामसुंदर परसवानी यांचे दिवंगत भाऊ सुरेश परसवानी यांच्या कुटुंबातील सदस्य गायब झाले आहेत. त्यामुळे यांनी ही तक्रा पोलिसात दाखल केली आहे. शिवाय त्यांना तातडीने शोधावे अशी मागणी ही केली आहे. ते बाहेर फिरायला गेले असावेत असं आम्हाला वाटलं असं ही त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे.
कुटुंबातील जे सदस्य गायब झाले आहेत त्यात 57 वर्षीय हर्षा परसवानी, 42 वर्षीय जितेंद्र परसवानी, 40 वर्षीय इशिता, 21 वर्षीय खुशी आणि 12 वर्षीय कृष्णा यांचा समावेश आहे . खरं तर 24 जूनपासून सुरेश परसवानी यांच्या कुटुंबातील हे पाचही सदस्य अचानक घरातून निघून गेले होते. त्यानंतर ते परत आलेच नाहीत. ते फिरायला गेले असावेत किंवा नातेवाईकांकडे गेले असावेत असा अंदाज लावला जात होता. पण बरेच दिवस झाले तरी हे कुटुंब त्यांच्या घरात दिसले नाही. घर बंद होते. त्यामुळे काही जणांना याचा संशय आला. त्यांनी याबाबत चौकशी केली. शिवाय त्यांच्या नात्यातील श्यामसुंदर यांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसात याबाबत तक्रार देण्यात आली.
पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर काही गोष्टी समोर आल्या आहेत. जे कुटुंब गायब झालं आहे त्या पैकी एका सदस्यावर कर्जाचा डोंगर असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी ही त्यांची शोधशोध केली. त्या कुटुंबातील सदस्यांचे मोबाईल लोकेशन तपासले गेले. त्यातून जी माहिती समोर आली त्याने पोलिस ही हादरले. नागपूरच्या या कुटुंबाचे शेवटचे मोबाईल लोकेशन हे पुणे दिसत होते. त्यानुसार नागपूर पोलिसांनी याची माहिती पुणे पोलिसांना दिली आहे. शिवाय त्यांच्या मोबाईलच्या आधारे आणखी काही माहिती मिळते का ते पोलिस तपासत आहेत. शिवाय कुटुंब बेपत्ता होण्याचं खरं कारण काय आहे याचा ही शोध पोलिस घेत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world