जाहिरात

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई; FDA च्या इतिहासात पहिल्यांदाच राबवली 'ही' मोहीम

राज्यातील धडाडीचे आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे नुकतेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी रुजू झाले आहेत.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई; FDA च्या इतिहासात पहिल्यांदाच राबवली 'ही' मोहीम

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Tukaram Mundhe News : राज्यातील धडाडीचे आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे नुकतेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी रुजू झाले आहेत. २१ वर्षात ही त्यांची २५ वी बदली आहे. त्यांच्या कार्यशैलीप्रमाणे अन्न आणि औषध विभागात रुजू झाल्यानंतर त्यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. प्रशासनाच्या आयुक्तपदी रुजू होताच राज्याच्या FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची जोरदार मोहीम राबवली जात आहे.

मुंबईतही कारवाई, दोघांना अटक...

आज ३० मे रोजी एकाच दिवसात तब्बल ३३ आरोपींना अटक करण्यात आले असून २८ आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. याशिवाय लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या विभागात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणांवरून ६ लाख १७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात मुंबईत दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

नक्की वाचा - Jalgaon News : जीव वाचवणाऱ्या रुग्णवाहिकेची वेगळ्याच कारणाने वाहतूक; वाहनाचं दार उघडताच...

कोकणात २० आस्थापनाविरुद्ध कारवाई

कोकणात तब्बल २० आस्थापनाविरुद्ध कारवाई करून २१ लोकांना अटक करण्यात आली आहे. पुण्यात ८ ठिकाणी कारवाई करून ८ जणांना अटक केली असून नाशिकमधून एकाला अटक करण्यात आली आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कारवाईअंतर्गत एकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्याचे कलम २६, २७, ३० (२) (a) आणि कलम ५९ अंतर्गत एफआयआर दाखल करून ३३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांची नवी संकल्पना...

राज्यातील अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांची नवीन संकल्पना राबवली आहे. भेसळयुक्त अन्न पदार्थावर धडक मोहीम राबवण्यासाठी तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून आता अन्न व औषधाबाबत तक्रारीसाठी नवीन "अॅप" तयार करण्यात येणार आहे. याशिवाय तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना भेसळयुक्त आणि प्रतिबंधित अशा अनुचित घटना दिसल्या की, त्यांनी तत्काळ संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com