जाहिरात

नाशिकमध्ये दोन अग्निवीरांचा ट्रेनिंगदरम्यान मृत्यू, अर्टिलरी सेंटरमधील घटना

नाशिकरोड परिसरातील 'आर्टिलरी सेंटर' येथे गुरुवारी दुपारी ही घटना घडल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. अग्निवीर गोहिल विश्वराज सिंग (20) आणि सैफत शिट (21) यांचा स्फोटात मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिकमध्ये दोन अग्निवीरांचा ट्रेनिंगदरम्यान मृत्यू, अर्टिलरी सेंटरमधील घटना
प्रतिकात्मक फोटो

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आर्टिलरी सेंटरमध्ये चाचणीदरम्यान तोफेतून डागलेल्या शेलचा स्फोट होऊन दोन अग्निवीर जवानांचा मृत्यू झाला. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. नाशिकरोड परिसरातील 'आर्टिलरी सेंटर' येथे गुरुवारी दुपारी ही घटना घडल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

अग्निवीर गोहिल विश्वराज सिंग (20) आणि सैफत शिट (21) यांचा स्फोटात मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अग्निवीरांचा एक टीम तोफेतून गोळे सोडत असताना एका गोळ्याचा स्फोट झाला. त्यात दोन अग्निवीर जखमी झाले. 

जखमी दोन्ही अग्निवीरांना देवळाली येथील एमएच रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले. हवालदार अजित कुमार यांच्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
अमेरिकेतून आलेल्या वराचं ब्लॅकमेल प्रकरण, पुण्यातील नवरीच्या भावाला कोर्टाचा धक्का
नाशिकमध्ये दोन अग्निवीरांचा ट्रेनिंगदरम्यान मृत्यू, अर्टिलरी सेंटरमधील घटना
shivsena shinde group ready to leave bhandup vidhansabha seat for mns amit thackeray
Next Article
अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार? शिवसेना शिंदे गट 'ही' जागा सोडण्यास तयार?