जाहिरात

Nashik News : दोन सख्ख्या भावांच्या हत्येने नाशिक हादरलं; परिसरात तणावपूर्ण स्थिती

Nashik Crime News : प्रशांत आणि उमेश यांची हत्या का झाली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पोलिसांनी या खुनाच्या तपासाकरिता 4 टीम तयार केल्या आहेत.

Nashik News : दोन सख्ख्या भावांच्या हत्येने नाशिक हादरलं; परिसरात तणावपूर्ण स्थिती

किशोर बेलसरे, नाशिक

Nashik Double murder News : नाशिक दोन सख्ख्या भावांच्या हत्येने हादरलं आहे. नाशिकरोड आंबेडकरवाडी बोधले नगर परिसरात ही घटना घडली आहे. दोघांवरही धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली. प्रशांत जाधव,उमेश उर्फ मुन्ना जाधव अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नाशिकरोड आंबेडकरवाडी घडलेल्या या हत्याकांडानंतर उपनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दोन्हीही भावांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रशांत आणि उमेश जाधव दोघेही उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. 

(नक्की वाचा-  Job in Germany : राज्यातील तरुणांची जर्मनीत नोकरीची संधी; राज्य सरकारचं खास उपक्रम)

प्रशांत आणि उमेश यांची हत्या का झाली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पोलिसांनी या खुनाच्या तपासाकरिता 4 टीम तयार केल्या आहेत. पोलिसांचा काही व्यक्तींवर संशय असून लवकर आरोपींना ताब्यात घेतले जातील, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

(नक्की वाचा-  Nagpur Violence: संतापजनक! नागपूरमध्ये हिंसक जमावाने घेरलं अन्... महिला पोलिसांसोबत काय घडलं?)

दुहेरी हत्येच्या या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. प्रशांत आणि उमेश यांचा परिसरात जनसंपर्क असल्याने रात्री उशिरापर्यंत जमावाने प्रचंड गर्दी केली होती. हत्येबाबत अधिकृती माहिती नाशिकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: