Solapur News : रात्री झोपताना एक चूक पडली महागात; सकाळी 2 चिमुरड्यांचा मृत्यू

रात्री झोपताना त्यांनी गॅस व्यवस्थित बंद केला नव्हता. आणि हीच एक छोटीशी चूक या कुटुंबाला महागात पडले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

सौरभ वाघमारे, प्रतिनिधी Solapur News :  घरामध्ये झालेल्या गॅस गळतीमुळे सोलापुरातील एक कुटुंब बेशुद्ध झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री झोपताना त्यांनी गॅस व्यवस्थित बंद न केल्याने ही  घटना घडली असून यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चिमुकल्या बहीण भावासह आजीचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

गवंडी काम करणारे युवराज मोहन सिंह बलरामवाले पत्नी रंजना आई विमल आणि दोन मुलं हर्ष आणि अक्षरासोबत लष्कर परिसरातील बेडर फुलजवळ राहतात. ३१ ऑगस्टच्या रात्री नेहमीप्रमाणे बलरामवाले यांचे कुटुंबीय जेवण करुन झोपी गेले. मात्र रात्री झोपताना त्यांनी गॅस व्यवस्थित बंद केला नव्हता. आणि हीच एक छोटीशी चूक या कुटुंबाला महागात पडले. 

त्या रात्री नेमकं काय घडलं? 

बंद खोलीत रात्रभर गॅस गळती झाली ज्यामुळे 5 जणांचा श्वास गुदमरल्यामुळे संपूर्ण कुटुंब बेशुद्ध झाले होते. सकाळी ११ वाजते तरी त्यांनी खोलीचं दार न उघडल्याने बलरामवाले यांच्या नातेवाईकांना फोन करून सर्व प्रकार सांगितला. नातेवाईकांनी घराचं दार उघडलं तर आत गॅसचा वास येत होता. याशिवाय पाचही जणांच्या तोंडातून फेस येत होता. हे पाहताच पाचही जणांना तातडीने रुग्णालात दाखल करण्यात आलं. मात्र या दुर्घटनेत बहीण-भावाचा मृत्यू झाल. तर वडील, आई, आजी या तिघांवर सिव्हील रुग्णालयात उपचार सुरू होते. दुर्दैवाने उपचारावेळी आजीचाही मृत्यू झाला. 

4 वर्षांची अक्षरा बलरामवाले हिचा मृत्यू झाला असून तिची आई रंजना ही रुग्णालयात दाखल आहे

नक्की वाचा - Gas Cylinder Price: खुशखबर! LPG गॅस सिलेंडर झाले स्वस्त; आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या भाव

हर्ष बलरामवाले (6), अक्षरा बलरामवाले(4)  विमल मोहन सिंग बलरामवाले (60) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर युवराज मोहन सिंग बलरामवाले (40), रंजना युवराज बलरामवाले (35) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  युवराज हा गवंडी तर रंजना ही विडी कामगार म्हणून काम करते. आई विमल ही एका रुग्णालयात कामाला होती.  नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी सिव्हिल रुग्णालयात गर्दी केली होती. याप्रकरणी सिव्हिल पोलीस चौकी येथे नोंद करण्यात आली आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article