विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधीमंडळात केलेल्या शिवीगाळ प्रकरणी त्यांची पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. अंबादास दानवे यांच्यावर केलेल्या कारवाईबाबत उद्धव ठाकरे निषेध केला आहे. तसेच अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राची देखील माफी मागितली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, मी पक्षप्रमुख महाराष्ट्रातील माता-भगिनींची माफी मागतो. मात्र सुधीर मुनगंटीवार, अंबादास दानवे यांनी देखील महिलांचा अपमान केला होता. मग त्यांचं निलंबन देखील तुम्ही करणार का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला.
(नक्की वाचा - मोठा निर्णय! विरोध पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, विधानपरिषदेत गदारोळ)
विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबित करण्यात आलं आहे. एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा होणे गरजेचं असतं. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून त्यानंतर निर्णय घेणे अपेक्षित असते. मात्र एकतर्फी निर्णय घेणे म्हणजेच कुणीतरी मागणी केली, त्यानुसार निर्णय घेतला हे लोकशाहीला घातक, लोकशाही विरोधी निर्णय आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
अंबादास दानवे यांनादेखील बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी होती. मात्र कुणालाही बोलू दिलं नाही. एकप्रकारे ठरवून, षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्यांना निलंबित केलं गेलं. असं महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा झालं असेल. सगळा अन्याय महाराष्ट्रातील जनता डोळे उघडून पाहत आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे थेट काँग्रेस कार्यालयाकडे निघाले, धनंजय मुंडेंनी आवाज दिला अन्...)
विधानपरिषद निवडणुकीतील आमचा विजय झाकून टाकण्यासाठी हा निर्णय त्यांनी घेतला असावा. म्हणजे आमच्या विजयाची चर्चा बाजूला होईल आणि या निर्णयाची चर्चा होईल. त्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाची देखील आता चिरफाड व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मूळ मुद्दा बाजूला व्हावा म्हणून आकसाने विरोधी पक्षनेत्यांचं निलंबन करण्यात आलं आहे, ज्याचा आम्ही निषेध करतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.