विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हे निलंबन पाच दिवसांसाठी असेल. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी निलंबनाची घोषणा केली. तर चंद्रकांत पाटील यांनी निलंबनाचा ठराव विधान परिषदेत मांडला. त्यानंतर विधान परिषदेत जोरदार गदारोळ झाला. दानवेंना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र अशा ठरावावर चर्चा होत नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यावेळी सभागृहात एकच गोंधळ झाला. शिवाय विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीही केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. दानवे यांनी आपल्याला अपशब्द वापरले असा आरोप लाड यांनी केला होता. शिवाय दानवे यांच्यावर कारवाईची मागणी लाड यांनी केली. दानवे यांनीही आपल्या बरोबरचे लाड यांचे वर्तन चुकीचे होते असे सांगितले होते. शिवाय कोणत्याही कारवाईला आपण घाबरत नाही असेही ते म्हणाले. त्यामुळे दानवे यांच्यावर कारवाई होणार हे जवळपास निश्चित होते.
(नक्की वाचा- कोणत्या महिलांना मिळणार 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ)
त्यानुसार आज मंगळवारी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चंद्रकांत दानवे यांच्या निलंबनाचा ठराव मांडला. दानवे यांचे सभागृहातले वर्तन हे अशोभनिय होते. शिवाय त्यांनी केलेले वक्तव्य हे बेशिस्त पणाचे होते असेही या ठरावात पाटील म्हणाले. त्यामुळे अशा गोष्टींना पायबंद बसण्यासाठी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना पुढील पाच दिवसांसाठी निवंबित केले जावे असा ठराव पाटील यांनी मांडला. हा ठराव विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी मतास टाकला. आवाजी मतदानाने हा ठराव मंजूरही करण्यात आला.
(नक्की वाचा- 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'साठी तलाठी कार्यालये फुल्ल; महिलांचा मोठा प्रतिसाद)
दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर विधान परिषदेत एकच गोंधळ झाला. दानवे यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहीजे अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र आता निलंबन झाले आहे त्यामुळे त्यांना बोलता येणार नाही असे गोऱ्हे यांनी सांगितले. तर अशा ठरावावर चर्चा होत नाही. प्रथापरंपरा मोडू नका अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले. त्यानंतर सभापतींनी पुढचे कामकाज पुकारले. तरही विरोधकांची घोषणाबाजी सुरूच होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world