जाहिरात
Story ProgressBack

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी

राज्य सरकारने केंद्रातील एनडीए सरकारची मदत घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमुक्त करण्याची आमची मागणी आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 

Read Time: 2 mins
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी
मुंबई:

राज्यातील शेतकऱ्यांची सध्याची स्थिती वाईट आहे. रोज कुठे ना कुठे शेतकरी आत्महत्या होत आहेत.डबल इंजिन सरकारला आता भरपूर इंजिन जोडले आहेत. डब्यांचा पत्ता मात्र नाही. राज्य सरकारने केंद्रातील एनडीए सरकारची मदत घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमुक्त करण्याची आमची मागणी आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 

शेतकऱ्यांची वीज बिले देखील माफ करावीत. लाडकी बहीण योजना आणली तर आम्हाला आनंद आहे.लेकींची काळजी घेत आहेत पण लेकांची देखील काळजी करावी. लाडका पुत्र ही देखील योजना त्यांनी आणावी. आज अनेक तरुण बेरोजगार आहेत. तरुणांचे लोंढे आज नोकरीच्या शोधात फिरत आहेत. त्यामुळे त्यांचा देखील विचार करावा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

अर्थसंकल्पाकडे आमचं लक्ष आहे. कॉन्ट्रॅक्टर्ससाठी मोठा घोषणा केल्या जाऊन नयेत. जर आवश्यकता नसेल तर त्या योजना पुढे ढकलल्या पाहिजे. राज्याला कर्जबाजारी कराल असं काही करू नका, अशी देखील मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

मुंबईत मराठी माणसांना 50 टक्के राखीव घरे

मुंबईतून मराठी माणूस बाहेर फेकला जात आहे. मुंबईत मराठा माणसांना घरे मिळत नाहीत. त्यामुळे मुंबईत मराठी माणसांना 50 टक्के घरे राखीव असावे असं विधेयक येत आहे. 50 टक्के राखीव जागा मराठी माणसांना मिळाली पाहिजे, अशी मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
विकेंडचा प्लान करताय? कुठे असेल मुसळधार पाऊस, Rain Alert वाचा अन् ठरवा!
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी
maharashtra budget 2024 ajit pawar announce mukhyamantri ladaki bahin yojna for women
Next Article
राज्यातील महिलांसाठी 'लाडकी बहीण' योजनेची घोषणा; दरमाह 1500 रुपये मिळणार
;