'ऑपरेशन टायगर'मुळे शिवसेना ठाकरे गटात मोठ्या उलथापालथीची शक्यता वर्तवली जात आहे. खासदार फुटीनंतरही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शांत राहण्याची भूमिका घेतली आहे. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अशा शिवसेना वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर केली आहे.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक फोटो शेअर करत अत्यंत सूचक आणि काव्यात्मक ओळी उद्धव ठाकरे यांनी पोस्ट केल्या आहेत. "किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी, काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी", या ओळींच्या माध्यमातून त्यांनी सध्याच्या राजकीय संकटाच्या आणि अंधाराच्या काळातही संघर्षातून पुन्हा तेजाचे म्हणजेच यशाचे दिवस येतील, असा ठाम विश्वास शिवसैनिकांना दिला आहे.
(नक्की वाचा- Shiv Sena UBT Crisis: उद्धव-आदित्य ठाकरे गप्प, संजय राऊतांची बॅटिंग; ठाकरे गटात नेमकं काय सुरुये?)
डॅमेज कंट्रोलसाठी 'मातोश्री' अॅक्शन मोडमध्ये
खासदार फुटीच्या या गंभीर संकटानंतर आता ठाकरे गटाकडून 'डॅमेज कंट्रोल'साठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकसभा मतदारसंघांमधील खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे, त्या सर्व मतदारसंघांवर आता विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
बैठकीची मुख्य वैशिष्ट्ये
आजचा (19 जून) शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन सोहळा आटोपल्यानंतर, उद्यापासून म्हणजेच 20 जूनपासून या महत्त्वाच्या बैठकांचा सिलसिला सुरू होणार आहे. संबंधित मतदारसंघातील सर्व विद्यमान आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि प्रमुख स्थानिक पदाधिकाऱ्यांना मुंबईत पाचारण करण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Omraje Nimbalkar Exclusive: ओमराजे निंबाळकर शिंदेना धप्पा देणार? पत्रावर सही केली नाही? स्पष्टच बोलले)
स्थानिक पातळीवर संघटना मजबूत ठेवणे, कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करणे आणि पुढील राजकीय रणनीती निश्चित करणे हा या बैठकीचा मुख्य हेतू आहे. 2022 मधील आमदार फुटीनंतर आता 2026 मध्ये खासदारांच्या संभाव्य बंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरले असून, ते या बैठकांद्वारे थेट जमिनीवरील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world