Ambarnath News: गुन्हेगारांची हिंमत वाढली! डोळ्यात मिरचीपूड टाकून महिलेला भररस्त्यात लुटलं, VIDEO आला समोर

Crime News: अंबरनाथच्या नाऱ्हेन गावात महिलेच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही जलद कारवाई केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Crime News: अंबरनाथ तालुक्यातील नाऱ्हेन गावात एका महिलेला भररस्त्यात लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 20 फेब्रुवारी रोजी विठा पाटील या महिला काही कामानिमित्त जुन्या पाण्याच्या टाकीजवळून पायी जात असताना, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी भररस्त्यात महिलेच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून तिचे दागिने लंपास केले. हिललाईन पोलिसांनी सतर्कता दाखवत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

झटापटीत वाचले 3 तोळे सोनं

हा गुन्हा करताना चोरट्यांनी अत्यंत घातक पद्धतीचा वापर केला. विठा पाटील यांच्या डोळ्यात चोरट्याने अचानक मिर्ची पावडर फेकून त्यांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 6 तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, डोळ्यात आग होत असतानाही विठा पाटील यांनी चोराला प्रखर विरोध केला. या झटापटीत चोराच्या हाती केवळ 3 तोळे सोने लागले, तर उर्वरित ३ तोळे सोने वाचवण्यात त्या यशस्वी झाल्या.

पाहा VIDEO

(नक्की वाचा-  Mumbai News: नागरिकांच्या जीवाशी खेळ; फळांना उंदीर मारायचं औषध लावणाऱ्या फळविक्रेत्याचा VIDEO व्हायरल)

पोलिसांची तत्परता आणि आरोपींना बेड्या 

घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असताना हिललाईन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्थानिक पोलीस पाटलांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. पोलिसांनी आकाश पाटील या मुख्य आरोपीला 24 तासांच्या आत अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी संग्राम मालकर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. या गुन्ह्यात सामील असलेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Viral Video: हसावं की रडावं! आवडीने विन्डो सीट बूक केलं, पण तरुणीला आला विचित्र अनुभव; पाहा व्हिडीओ)

भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नाऱ्हेन गावातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, पोलिसांनी जलद गतीने आरोपीला अटक केल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. चोरीला गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्याचे काम आता पोलीस करत आहेत.

Topics mentioned in this article