जाहिरात

Viral Video: हसावं की रडावं! आवडीने विन्डो सीट बूक केलं, पण तरुणीला आला विचित्र अनुभव; पाहा व्हिडीओ

Viral Video: मुंबई-उदयपूर इंडिगो विमानात एका तरुणीला आपली सीट विना कुशनची आढळली. एअर होस्टेसने नंतर तातडीने मदत केली असली तरी, हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Viral Video: हसावं की रडावं! आवडीने विन्डो सीट बूक केलं, पण तरुणीला आला विचित्र अनुभव; पाहा व्हिडीओ

Viral Video: विमानाने प्रवास करताना अनेकदा आपल्याला सुखद किंवा त्रासदायक अनुभव येतात, मात्र एका तरुणीला चक्क 'मजेशीर' अनुभवाला सामोरे जावे लागले. मुंबईहून उदयपूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात (IndiGo Flight) विन्डो सीट बुक करूनही त्या सीटचे कव्हरच गायब असल्याचे पाहून तरुणी अवाक झाली.

विमान प्रवासात निसर्गाचा आणि विशेषतः सूर्यास्ताचा आनंद घेता यावा म्हणून अनेक प्रवासी जास्तीचे पैसे मोजून 'विन्डो सीट' बुक करतात. ऋचा कानोलकर या तरुणीनेही मुंबई ते उदयपूर प्रवासासाठी अशाच प्रकारे खिडकीजवळील सीट आरक्षित केली होती. अगदी सकाळी लवकर उठून तिने ही सीट शोधून बूक केली. मात्र, विमानात प्रवेश केल्यावर आपल्या सीटची अवस्था पाहून तिला हसावे की रडावे हेच कळेनासे झाले. कारण तिच्या सीटचे 'कुशन कव्हर'च गायब होते.

पाहा VIDEO

(नक्की वाचा-  Mumbai News: नागरिकांच्या जीवाशी खेळ; फळांना उंदीर मारायचं औषध लावणाऱ्या फळविक्रेत्याचा VIDEO व्हायरल)

एअर होस्टेसही झाली चकीत!

ऋचा जेव्हा आपल्या जागेवर पोहोचली, तेव्हा तिला फक्त सीटचा सांगाडा दिसला. तिने या प्रकाराबाबत तात्काळ विमानातील एअर होस्टेसला माहिती दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सुरुवातीला एअर होस्टेसलाही हा प्रकार पाहून धक्का बसला. मात्र काही वेळाने समोर आले की, त्या सीटचे जुने कुशन ओले झाले होते. त्यामुळे ते बदलण्यासाठी नेण्यात आले होते. मात्र नवीन कुशन बसवण्यापूर्वीच प्रवाशांचे बोर्डिंग सुरू झाले होते. तक्रार केल्यानंतर एअर होस्टेसच्या मदतीने तातडीने तिथे नवीन कुशन बसवण्यात आले आणि तरुणीचा पुढचा प्रवास सुरळीत पार पडला.

(नक्की वाचा-  Kalyan News: "आई-बाबा त्रास करुन घेऊ नका..." बारावीच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन; सुसाईड नोटही सापडली)

सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

ऋचाने हा सर्व मजेशीर अनुभव आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. "मी सूर्यास्त पाहण्यासाठी विन्डो सीट बुक केली होती, पण मला सीटच मिळाली नाही!" अशा आशयाची तिची पोस्ट आहे. सुदैवाने, ऋचाने हा प्रकार खेळीमेळीने घेतला आणि तिचा उदयपूरचा प्रवास सुखाचा झाला. इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केल्याचंही तिने सांगितलं.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com