जाहिरात

मातृभाषा उर्दू, तरीही अस्खलित मराठीत भाषण; उर्दू शाळेत 50 वर्षांपासून रंगतेय मराठी वक्तृत्व स्पर्धा

भाषेला कोणत्याही जाती-पातीची वा धर्माची सीमा नसते.  

मातृभाषा उर्दू, तरीही अस्खलित मराठीत भाषण; उर्दू शाळेत 50 वर्षांपासून रंगतेय मराठी वक्तृत्व स्पर्धा
मुंबई:

मुंबईतील एका उर्दू शाळेत गेल्या 50 वर्षांपासून एक सकारात्मक पाऊल उचललं जात आहे. उर्दू भाषेच्या या शाळेत मराठीचा गौरव केला जात असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. भाषेला कोणत्याही जाती-पातीची वा धर्माची सीमा नसते.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राजन खान, हमीद दलवाई, यु.म. पठाण,  इसक मुजावर, शाहिर अमर शेख, यास्मिन शेख यांसारख्या दिग्गजांचं मराठीत अनन्यसाधारण योगदान आहे. धर्माने मुस्लीम असतानाही मराठी साहित्य वाढविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे राजकीय पातळीवर धार्मिक तेढ वाढवून दोन समाजामध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर परिस्थिती वेगळी आहे.

भिवंडी सारख्या बहुभाषिक शहरात भिवंडी व्हिवर्स एज्युकेशन सोसायटीच्या समदिया उर्दू हायस्कूलच्या वतीने गेल्या 50 वर्षांपासून मराठी वक्तृत्व स्पर्धा भरविली जाते. यंदाची ही 51 वी मराठी वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत शहरातील 32 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी मराठी मातृभाषा नसणाऱ्या स्पर्धक विद्यार्थ्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने आपलं मनोगत व्यक्त केलं.

ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार,  मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन!

नक्की वाचा - ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन!

भिवंडीत मराठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून या शहराशी नाळ जोडणाऱ्या उपक्रमाची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलं. तर यावेळी आंतरशालेय चित्रकला स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा सुध्दा गौरव करण्यात आला आहे. मुख्याध्यापक साजिद सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेचे आयोजक जुल्फिकार शेख आणि इतरांनी विशेष मेहनत घेतली.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com