जाहिरात

Viral Video : ऑफिसमधल्या मराठी महिलेला शिवीगाळ केल्याचा आरोप, मनसेनं परप्रांतीय व्यक्तीला दिला चोप

Viral Video: नवी मुंबईतील मराठी विरुद्ध अमराठी वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video : ऑफिसमधल्या मराठी महिलेला शिवीगाळ केल्याचा आरोप, मनसेनं परप्रांतीय व्यक्तीला दिला चोप
"Viral Video: मनसे कार्यकर्त्यांनी अमराठी व्यक्तीला शिकवला धडा"
Megh Updates X

Viral Video: मराठी भाषेच्या मुद्यावर मनसे कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा अमराठी व्यक्तीला मारहाण केल्याचे वृत्त समोर आलंय. संबंधित व्यक्ती कामाच्या ठिकाणी महिला सहकाऱ्यांना शिवीगाळ करुन अश्लील भाषेचा वापर करून त्रास देत असल्याचा दावा मनसे कार्यकर्त्यांनी केलाय. इतकंच नव्हे तर कंपनीच्या मालकालाही शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. अमराठी व्यक्तीला मनसेने कार्यालयात बोलावून चोप दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण नवी मुंबईतील असल्याचे म्हटलं जातंय. एनडीटीव्ही मराठी या व्हिडीओची पुष्टी करत नाही.

लेखी स्वरुपात माफीनामा लिहून घेतला

महाराष्ट्रात राहून मराठी महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांची मुजोरी मुळीच सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही यावेळेस मनसे कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला दिला. त्याच्याकडून लेखी स्वरुपात माफीनामाही घेण्यात आलाय. निवडणुकीच्या तोंडावर मनसेनं अशा पद्धतीनं परप्रांतीय तरुणाला चोप दिल्याने पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद तापण्याची शक्यता आहे.

Kalyan News: भाषा वादात अर्णवचा बळी, पण राजकारण्यांची भलतीच खेळी, वाद चिघळणार?

(नक्की वाचा: Kalyan News: भाषा वादात अर्णवचा बळी, पण राजकारण्यांची भलतीच खेळी, वाद चिघळणार?)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com