मनोज सातवी
पोलिसांवर हफ्ता घेण्याचे अनेक आरोप होत आले आहेत. अनेक व्हिडीओ ही त्याबाबतचे समोर आले आहेत. अनेक पोलिसांवर कारवाई ही झाली आहे. मात्र असं असताना ही हफ्ता घेण्याच्या घटना काही कमी होताना दिसत नाही. असाच एक प्रकार वसईत समोर आला आहे. विशेष म्हणजे त्याचा एक व्हिडीओ ही समोर आला आहे. यात पोलिस कर्मचारी हफ्ता मागताना दिसत आहे. तो दिला नाही म्हणून त्या स्टॉल वाल्याला मारहाण आणि शिवीगाळ होताना ही या व्हिडीओत दिसत आहे. पीडित स्टॉलवाल्याने याबाबत गंभीर आरोप करत पोलिसातच धाव घेतली आहे.
वसई पूर्वेतील सातिवली भोयदापाडा इथे मोहम्मद सैर्फुल शेख याचा ठेला आहे. तो या ठेल्यावर अंडा भुर्जीचा धंदा करतो. त्याच्याकडून पोलिसाने हफ्ता मागितला होता असा त्याचा आरोप आहे. तो हफ्ता न दिल्यामुळे त्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा ही त्याचा आरोप आहे. या मारहाणीचा व्हिडीओ ही या ठेला वाल्याने समोर आणला आहे. त्यामुळे या पोलिसासमोरील अडचणी वाढल्या आहेत. ऐवढेच काय तर हा पोलिस कुठल्या पोलिस चौकीत असते, शिवाय त्याचे नाव ही सांगितले आहे.
या फेरीवाल्याला हप्ता न दिल्याच्या कारणावरून एका पोलिसाने भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. असा गंभीर आरोप पीडित व्यक्तीचा आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पीडिताच्या म्हणण्यानुसार, धंदा सुरू ठेवण्यासाठी अगोदर 15 हजार रुपये आणि दरमहा 3 हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी करण्यात आली होती. त्यातील 15 हजार रूपये ठेला व्यालाने संबंधीत पोलिसाला दिले ही होते. मात्र त्यानंतर ही त्याची पैशांची मागणी सुरूच होती असा आरोप केला आहे.
या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित पोलिसावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत मारहाण झालेल्या पीडित मोहम्मद सैर्फुल शेख याने ही आपल्याला न्याय मिळावा असं सांगितलं आहे. नियमा प्रमाणे जर काही फाईन हवा होता तर आपण भरला असता. पण आपल्याला मारहाण का केली गेली. आपल्याला शिव्या का दिल्या अशी विचारणाच त्याने केली आहे. शिवाय संबंधीत पोलिसावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ही त्यांनी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world